शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

करंजगाव शिवारात वस्त्यांवर दरोडा

By admin | Updated: August 31, 2016 00:37 IST

परसोडा : करंजगाव (ता. वैजापूर) शिवारातील नरोडे वस्ती व रोठे वस्तीवर सोमवारी (दि.२९) रात्री साडेअकरा ते एक वाजेच्या सुमारास दरोडा पडला.

परसोडा : करंजगाव (ता. वैजापूर) शिवारातील नरोडे वस्ती व रोठे वस्तीवर सोमवारी (दि.२९) रात्री साडेअकरा ते एक वाजेच्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांनी दोघांना बेदम मारहाण करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६0 ते ७0 हजार रुपये घेऊन पोबारा केला. दोन्ही वस्त्यांवर दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमीसह पाच जण जखमी झाले. करंजगाव रेल्वेस्थानकानजीक चंद्रभान बारकू नरोडे यांच्या घराची कडी तोडून रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. नरोेडे यांना दोन तास खोलीत डांबले. घरातील व बाहेरील विज पुरवठा खंडित करून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून महिलांकडे पैसे व दागिन्यांची मागणी केली. दागिने न दिल्यामुळे चंद्रभान नरोडे यांना जबर मारहाण केली. तेथून दरोडेखोरांनी मुंबई-नागपूर हायवेवर असलेल्या मुलचंद भिक्कन रोठे यांच्या घराचा दरवाजा कुऱ्हाडीने तोडून घरात प्रवेश केला. सुंदरबाई रोठे यांना मारहाण केली. हे पाहून वाल्हूबाई रोठे (३०) या दरोडेखोरांच्या मारण्याच्या भितीने घराच्या छतावर गेल्या व तेथून खाली उडी मारल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी मदतीला धाऊन आले. त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.ही माहिती वैजापूर पोलीस ठाण्याला कळविल्यानतंर काही वेळातच पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, स.पो.नि. प्रकाश पाटील, गणेश जमादार, नारायण कटकुरे, गणेश पाटील हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने करंजगाव परिसर पिंजून काढला, परंतु दरोडेखोरांचा तपास लागला नाही.दोन्ही वस्तीवरील जखमी चंद्रभान नरोडे, बबई नरोडे, गुलचंद रोठे, सुंदरबाई रोठे, वाल्हूबाई रोठे यांना उपचारासाठी रात्रीच वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळास पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस निरीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्ष पोद्दार यांनी भेट दिली. श्वानपथक व अंगुली निर्देशकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने हडस पिंपळगावपर्यंत माग काढला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर करीत आहे.