शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथ पोकळे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 00:52 IST

जालना : पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची पुणे शहर उपायुक्त पदी बदली झाली

जालना : पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची पुणे शहर उपायुक्त पदी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर पुणे सीआयडीचे अधीक्षक रामनाथ पोकळे हे रुजू होणार आहेत. तर अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांची नागपूर शहर उपायुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागेवर लातूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाने गुरुवारी रात्री उशिरा काढले.राज्यातील बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जालन्याच्या पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांचा सेवा कार्यकाल संपुष्टात आल्याने त्यांची पुणे शहर उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर भोकरदन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिलेले रामनाथ पोकळे यांची जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोकरदनमध्ये कार्यरत असताना पोकळे यांची उल्लेखनीय काम केले होते. प्रोबेशनरी म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर भिवंडी येथे त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या पोकळे पुण्यात राज गुन्हे अन्वेषण विभागातील सायबर सेलचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. पोलीस ठाणे आॅनलाईन करण्याच्या दृष्टिने त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भिवंडी येथे कार्यरत असताना आॅईल भेसळ करणाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई करुन तेल माफियांवर मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तर आता अवैध गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक यांसह इतर आव्हाने पोकळे यांच्यासमोर असतील. पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांत शिस्त आणण्यासह दामिनी पथक स्थापन करुन रोडरोमिओंना धडा शिकवला.त्यामुळे छेडछाडीचे प्रमाण कमी झाले. तीन वर्षांच्या कार्यकाळात सिंह यांनी आपल्या कार्यपद्धतीची छाप पोलीस दलावर सोडली. तर अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या जागेवर लता फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माकणीकर यांनी गत दोन वर्षांच्या काळात उल्लेखनीय काम केले आहे. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी पूर्ण केला. (प्रतिनिधी)