शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रमेश पवारांनी तडकाफडकी लातूर सोडले!

By admin | Updated: May 18, 2017 00:19 IST

लातूर : लातूर मनपाचे आयुक्त रमेश पवार यांचा पदभार शासनाने काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे़ त्यामुळे पवार यांनी तडकाफडकी लातूर सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर मनपाचे आयुक्त रमेश पवार यांचा पदभार शासनाने काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे़ त्यामुळे पवार यांनी तडकाफडकी लातूर सोडले असून, एका चांगल्या अधिकाऱ्याला सात-आठ महिन्यातच कंत्राटदाराच्या बिलावरून पदभार सोडावा लागला आहे़ आठ महिन्यांपूर्वी रमेश पवार यांनी लातूर मनपाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतला़ पदभार घेताच त्यांनी मनपातील कामकाज आऊट सोर्सिंगद्वारे करण्यावर भर दिला़ स्वच्छता अभियानाच्या कामातही गती घेऊन शौचालयाची कामे पूर्ण केली़ मनपाचे चारही झोन कार्यालये सक्षम केली़ मुख्य कार्यालयाचा ताण कमी करून झोन कार्यालयातून नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला़ शिवाय, अमृत योजनेच्या कामालाही गती दिली़ अल्पावधीतच चांगला अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण केली़ मात्र त्यांचा पदभार शासनाने काढून घेतला़ चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी राहण्याऐवजी सरकारने त्यांनाच दणका दिला, अशी चर्चा मनपाच्या वर्तुळात सुरू आहे़स्थानिक पुढाऱ्याच्या मदतीने एका बड्या कंत्राटदाराने बिल काढण्यासाठी मनपा आयुक्त पवार यांच्यावर दबाव आणला होता़ साडेतीन कोटीच्या आसपास बिल असल्याचे बोलले जाते़ परंतु, मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बिल काढल्यास त्यांनी नकार दिला होता़ त्यामुळे राज्य शासनाकडे संबंधित कंत्राटदार व काही स्थानिक पुढारी वजन वापरून त्यांचा पदभार काढण्यास यशस्वी झाले, अशीही चर्चा मनपाच्या वर्तुळात आहे़ सध्या मनपातील तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे व सफाई कामगारांचे वेतन थकले आहे़ या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केल्याशिवाय कोणत्याही कंत्राटदाराचे बिले काढता येणार नाहीत, असा पवित्रा पवार यांनी घेतला होता़ त्यामुळे दुखावलेल्या ‘त्या’ कंत्राटदाराने स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने शासनाकडे वजन वापरले आणि त्यात ते यशस्वी झाले, अशी जोरदार चर्चा मनपात आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेचा निधी व मनपाने काढलेल्या कोट्यवधीच्या कंत्राटावरून आयुक्त आणि कंत्राटदारामध्ये मतभेद झाले होते़ त्यामुळेच त्यांचा पदभार काढण्यासाठी राजकीय वजन वापरल्याची चर्चा आहे़ दरम्यान, शासनाकडून आदेश प्राप्त होताच आयुक्त रमेश पवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून पुणे गाठले आहे़