शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले यांच्या रिपाइंला निवडणूक तर लढायचीय; पण चिन्हाबाबतचा संभ्रम कायम

By विजय सरवदे | Updated: December 17, 2025 14:14 IST

पक्षात दोन प्रवाह; भाजपच्या 'कमळ' चिन्हावर लढायचे की स्वतंत्रपणे, रिपाइंची ओळख जपायची?

छत्रपती संभाजीनगर : रिपाइंने (आठवले) उत्स्फूर्तपणे महापालिका निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. महायुतीमध्ये भाजपकडे १५ जागांची मागणी केली. जर त्यांनी काही जागा रिपाइंला सोडल्या, तर भाजपचे ‘कमळ’ की अन्य कोणत्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जायचे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपाइंने निवडणूक आयोगाकडे ‘ऊस उत्पादक शेतकरी’ या चिन्हाची मागणी केली आहे. मात्र, अद्याप आयोगाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पक्षामध्ये चिन्हाबद्दलचा संभ्रम कायम आहे.

यासंदर्भात रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसह जि.प., पं.स. निवडणुकीत यावेळी आमचा पक्ष महायुतीसोबत समर्थपणे रिंगणात उतरणार आहे. पण, महाराष्ट्रात रिपाइंला स्वतंत्र चिन्ह नाही. या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ‘चिन्हा’चा प्रश्न चर्चेला आला होता. तेव्हा, ‘ऊस उत्पादक शेतकरी’ या चिन्हावर एकमत झाले. याच चिन्हावर नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत रिपाइंचे दोन उमेदवार निवडून आले. हेच चिन्ह महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइंला मिळावे, म्हणून निवडणूक आयोगाकडे आपण मागणी केली आहे. त्यावर आयोगाने अद्याप निर्णय कळविलेला नाही. जर हे चिन्ह महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने अंमलात आणले, तर राज्यभरातील महापालिका निवडणुकीत रिपाइंचे उमेदवार याच चिन्हावर लढतील. आमच्या पक्षात चिन्हाबाबत दोन प्रवाह आहेत. एक युतीमध्ये ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, तर दुसरा प्रवाह हा पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीतच निवडणूक लढवू, पण ‘कमळ’ नको, असा आहे.

बुधवारी दुपारी रिपाइंच्या शहर, जिल्हा व सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात उमेदवारांना अर्ज वाटप केले जातील. त्यानंतर एक-दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची, हे देखील पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले जाईल.

१५ जागांचा प्रस्तावरिपाइंने भाजपकडे १५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात दोन-चार दिवसांत त्यांच्याकडून नेमक्या किती जागा सोडणार, याबद्दल समजेल. आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी काम केले आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे रिपाइंसाठी भाजपला जागा सोडाव्या लागतील.

English
हिंदी सारांश
Web Title : RPI's election plans clouded by symbol confusion despite alliance efforts.

Web Summary : RPI (Athawale) prepares for municipal elections, seeking seats within the Mahayuti alliance. They've requested the 'Sugarcane Farmer' symbol, awaiting approval. Internal debate persists: contest on BJP's 'Lotus' or independently, highlighting RPI's identity. A decision is expected soon after candidate interviews.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकChhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Ramdas Athawaleरामदास आठवले