शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईद उत्साहात

By admin | Updated: July 8, 2016 00:34 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात रमजान ईद पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळीच ईदगाह मैदान व मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली.

जालना : शहरासह जिल्ह्यात रमजान ईद पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळीच ईदगाह मैदान व मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम बांधवांना सर्व समाजबांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख मौलाना तसेच मुफ्ती यांनी मार्गदर्शन केले. गुरूवारी सकळीच हजारो मुस्लिम बांधवांनी पारंपरिक तसेच नवीन पोशाख परीधान करून ईदगाह मैदान गाठले. कदीम जालना, सदर बाजार व गांधीनगर येथील ईदगाह मैदान व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी रमजाननिमित्त विशेष नमाज अदा केली. कदीम जालना ईदगाह मैदानावर ईदगाह सकाळी १० वाजता मुफ्ती रहमान यांनी नमाज पठण केले. यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, इकबाल पाशा, उपविभागीय अधिकारी श्रीकर चिंचकर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, बाबूराव सतकर, शब्बीर अन्सारी, डॉ. बद्रोद्दीन, अ‍ॅड. मुज्जमील, सत्संग मुंढे, राम सतकर, गणेश सुपारकर, अब्दुल हफिज, शेख महेमूद, बळीराम महाराज जोगस, राम सावंत आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह सदर बाजार येथे सकाळी १०.३० वाजता नमाज अदा करण्यात आली. यावेळी नूर मोहंमद यांनी नमाज पठण केले. याप्रसंगी नूर खान, रशीद पहेलवान, राजेश राऊत, गणेश राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्याचबरोबर ईदगाह गांधीनगर- सकाळी १० वाजता, दर्गा राजाबाग शेर सवार- सकाळी १०.१५ वाजता,मिया साहब दर्गा- सकाळी १० वाजता,गुलजार मशीद (मंगळबाजार) - ९.३० वाजता, जामा मशीद (जुना जालना) - १०.१५ वाजता, मदीना मशीद( जुना जालना)- सकाळी ९ वाजता येथे नमाज अदा करण्यात आली. (प्रतिनिधी)