शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीचा संदेश देत काढणार रॅली

By admin | Updated: February 18, 2016 23:45 IST

परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाणी, वीज बचत गटाच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देत जनजागृती रॅली काढली जाणार

परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाणी, वीज बचत गटाच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देत जनजागृती रॅली काढली जाणार असल्याची माहिती बचतगटाचे संस्थापक अध्यक्ष रणजीत कारेगावकर यांनी दिली.या संदर्भाने आयोजित पत्रकार परिषदेत कारेगावकर यांनी सांगितले, शहरातील इलेक्ट्रीशियन, प्लंबर व मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आ.डॉ.राहुल पाटील, नंदकुमार आवचार, कॉ.किर्तीकुमार बुरांडे यांच्या उपस्थितीत रॅलीचे उद्घाटन होईल. या रॅलीतून पाणीप्रश्नासह समाजातील विविध प्रश्नांवर जनजागरण केले जाणार आहे. तसेच २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अग्रवाल मंगल कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन केले आहे. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, कर्तृत्व, प्रचार, प्रसारामध्ये युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या पत्रकार परिषदेस शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चांदणे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंगारे, विष्णू म्हेत्रे, व्यंकटेश येरावार, बंडू मगर, मंचक दुधाटे, बाळासाहेब शिनगारे, कैलास बोबडे, मदन बोबडे, अशोक दळवी आदींची उपस्थिती होती. झरी येथे कार्यक्रमछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झरी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी ८.३० वाजता शिवाजी चौक येथे हा कार्यक्रम होणार असून त्यानंतर मोटारसायकल रॅली, दुपारी १२ वाजता रथयात्रा काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता विशाल देशमुख बोरीकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर शिव-शंभू टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)