शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- राजू शेट्टी

By admin | Updated: August 7, 2014 23:37 IST

जालना : शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली़

जालना : संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती झालेली आहे़ निर्सगानेच शेतकऱ्यांवर ही वेळ आणली, त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी केली़येथील मा़ फुलंब्रीकर नाट्यगृहात स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आयोजित जालना दुष्काळ मागणी परिषदेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत, युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, तुकाराम गवळी, जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमख भास्कर अंबेकर, रासपाचे मराठवाडा प्रमुख ओमप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती़शेट्टी म्हणाले, राजकारण आमचा धंदा नाही. चळवळ म्हणून व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण करत आहोत. आज शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे़ शेतकऱ्यांनी उभी केलेली सहकार चळवळ आज शासन मोडीत काढण्यास निघाले आहे़ राज्यातील १५८ साखर कारखाने खाजगी झाले़ एकेकाळी एकही खाजगी कारखाना नव्हता़शेतकऱ्यांसाठी असलेल्या कारखान्याला एकास नऊ प्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले़ ते फेडण्याची हमी राज्य सरकारने घेतलेले होती़ मात्र राज्यकर्तेच कारखान्याचे चेअरमन, संचालक झाले. त्यांनी कारखाना लुटला आणि लिलावात काढला़ तो घेणारे ही राज्यकर्तेच.त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यात आम्ही सत्तेवर येताच लिलाव करून विक्री झालेले कारखान्याच्या मालमत्तेची बाजारभावाप्रमाणे तुलना करून त्यात तफावत आढळ्यास संबंधितावर कारवाई करून कारखाने ताब्यात घेवू़ जोपर्यंत आम्ही धोरणात्मक प्रश्नावर मत देत नाही, तोपर्यंत राज्यकर्ते घाबरणार नाही़ वर्षानुवर्ष त्यांची दुकानदारी, घराणेशाही सुरू आहेत़ ती संपविण्यासाठी सर्वांनी महायुतीच्या पाठीशी राहावे असे आवाहन शेट्टी यांनी केले. (प्रतिनिधी)महायुतीकडे ३८ जागा सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणारआगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे ३८ जागेची मागणी केली असून १५ आॅगस्टपर्यंत त्यावर निर्णय होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़जालन्यात गुरूवारी आयोजित दुष्काळ मागणी परिषदेसाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते़ शेट्टी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही शिवसेना- भाजप बरोबर युती केली. यात इतर सहा घटक पक्ष असल्याने ही महायुती झाली आणि लोकसभेत मोठे यश मिळविले़ त्याचप्रमाणे महायुती विधानसभेतही यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून शेट्टी म्हणाले, जागा वाटपाचा तिढाही सुटणार आहे़ आम्ही स्वाभिमानी पक्षाला ३८ जागा देण्याची मागणी महायुतीकडे केली़ त्यात मराठवाड्यात जालना, भोकर, जिंतूर, पाथरी, भूम परांडा या जागांचा समावेश आहे़ आम्ही जरी ३८ जागांची मागणी केली असली तरी एकूण ६३ जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे़ मागणी केलेल्या ३८ पैकी ८ जागा या प्रस्थापितांच्या आहेत़ ज्या ठिकाणी कधीच मित्रपक्षाला यश आले नाही़, अशा जागांवर आम्ही लढणार आहे़ लोकसभेत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी यांना पूर्वीच घोषित केले होते़ महायुती मुख्यमंत्रीपदाचा उमेंदवार जाहीर करणार का ? या प्रश्नावर शेट्टी म्हणाले, ज्या पक्षाचे जास्त सदस्य निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल़ अगोदरच उमेदवार जाहीर करावयाचा असल्यास इतर दोन पक्ष मोठे आहेत़ त्यांनीच याबाबत निर्णय घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले़...तर सगळीकडे हिरवेगार असतेमराठवाड्यात मोठ्या प्रमाणात राज्यकर्त्यांनी सिंचन घोटाळा केलेला आहे. हा घोटाळा झाला नसता, आणि इमानदारीने धरणे, बंधाऱ्याची कामे झाली असती तर आज सर्वत्र हिरवेगार, असे चित्र दिसले असते. पाणी अडवा पाणि जिरवा सारख्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या छायेत भरडला जात आहे. त्यातच शासनाचे शेतकऱ्यांविरोधी धोरण असल्याचा आरोप केला.