शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राज यांचे जोरदार स्वागत

By admin | Updated: September 15, 2014 00:41 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज सायंकाळी औरंगाबादेत दाखल झाले. विमानतळावर त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर विमानतळापासून हॉटेल रामापर्यंत वाहन रॅली काढण्यात आली. मनसेने विधानसभेच्या मराठवाड्यातील सर्व जागांवर उमेदवार उतरविण्याचे निश्चित केले आहे. हे उमेदवार ठरविण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे सोमवारी विभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी राज ठाकरे यांचे आज सायंकाळी ५ वाजता विमानाने औरंगाबादेत आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, उपाध्यक्ष दिलीप चितलांगे आणि शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे विमानतळाबाहेर येताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. त्यानंतर विमानतळापासून भव्य वाहन रॅली काढण्यात आली. रॅलीत अनेक मोटारसायकली आणि चारचाकी वाहने सहभागी झाली. रॅलीद्वारे राज ठाकरे हॉटेल रामामध्ये पोहोचले. तेथेही कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. हॉटेलसमोरील रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते जमलेले होते. विमानतळावर जिल्हा संपर्कप्रमुख सतीश नारकर, गजानन काळे, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, नगरसेवक राज वानखेडे, अ‍ॅड. गणेश वानखेडे, भास्कर गाडेकर, गौतम आमराव, बिपीन नाईक, जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर, सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, शिवाजी कान्हेरे, संतोष पाटील, अरविंद धीवर, वैभव मिटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मुलगा अमितही सोबतराज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे हाही औरंगाबाद दौऱ्यावर आला आहे. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, आ. मंगेश सांगळे, शिशिर शिंदे हेही आज विमानाने त्यांच्यासोबत आले. पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, जिल्हा संपर्कप्रमुख सतीश नारकर, गजानन काळे हे आधीच औरंगाबादेत आलेले आहेत. मनसेच्या मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ यावेळेत शहरातील सागर लॉन येथे होणार आहेत.मुलाखतीत राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते, तसेच त्यांचा मुलगा अमित सोबत असणार आहे. मराठवाड्यातून दोनशे इच्छुक मुलाखती देणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.