शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
3
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
4
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
5
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
6
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
7
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
8
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
9
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
10
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
11
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
12
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
13
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
14
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
15
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
16
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
17
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
18
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
20
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?

बारावीच्या निकालात राजर्षी शाहू, दयानंद विज्ञानचा दबदबा कायम

By admin | Updated: May 31, 2017 00:35 IST

लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयाचा ९९.८२ टक्के निकाल लागला असून, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा ९८.७१ टक्के निकाल लागला आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयातील विज्ञान शाखेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे २३ विद्यार्थी आहेत. तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे १२९ विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेत श्रुती सोमशंकर महाजन ९४.३ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे. पूजा अशोक लमदाडे ९४ टक्के गुण घेऊन द्वितीय आली असून, शिवानी वंदेकर, रुपाली मुळे ९३.०८ टक्के गुण घेऊन तृतीय आल्या आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९९.७५ टक्के लागला असून, ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे २६ तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे ६९ विद्यार्थी आहेत. सत्यजित चामले ९४.७७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आला आहे. राधिका भुतडा या विद्यार्थिनीने ९४.४६ टक्के गुण घेऊन द्वितीय तर मुक्ता देशपांडे ९४.१५ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. कला शाखेचा निकाल ९६.७२ टक्के लागला असून अनुजा तिडके ही विद्यार्थिनी ८८.३१ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे. महादेवी चापुले ८७.८५ द्वितीय, रिशा वाघमारे ८६.१५ तृतीय आली आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ.पी.आर. देशमुख, सचिव अ‍ॅड. नारायणराव पाटील, प्रभारी सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव डॉ. डी. बी. गोरे, प्राचार्य एस.डी. साळुंके, उपप्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य एम.एम. दुरुगकर, पर्यवेक्षक प्रा. कल्याण कांबळे, प्रा. डी. के. देशमुख, प्रा. एन.बी. चव्हाण, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. ए.जे. राजू यांनी केले आहे.