शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राज ठाकरे यांच्याविरुद्धचे ‘ते’ दोषारोपपत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:40 IST

परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात महाराष्ट Ñनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी (दि.३) रद्द केले.

ठळक मुद्देचिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रकरण

औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात महाराष्ट Ñनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी (दि.३) रद्द केले.मनसेने २००८ साली परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर २१ आॅक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे येत असताना बदनापूरमध्ये १० ते १५ लोकांनी ‘राज ठाकरे जिंदाबाद’अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली. ‘राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना राज्यातून हाकला’ असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्याच्या घोषणा दिल्या. याविरुद्ध बसचालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३३६, १४३, १०९, ११४, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी ३० जानेवारी २००९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. राज ठाकरे यांच्या वतीने अ‍ॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला. मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत, तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला.ठाकरे यांनी त्यांच्याविरुद्धचे दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सुरुवातीस २००९ साली खंडपीठाने दोषारोपपत्रास अंतरिम स्थगिती दिली होती.याचिकेवर सोमवारी अंतिम सुनावणी झाली असता अ‍ॅड. लड्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २१ आॅक्टोबर २००८ रोजी बदनापूरमधील कथित घटनेच्या दिवशी राज ठाकरे यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा बदनापूरमधील घटनेत सहभाग नाही. अनोळखी व्यक्ती कोण होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संबंध नाही. तसेच चिथावणीखोर भाषण दिल्याचा कुठलाही सबळ पुरावा अभियोग पक्ष न्यायालयात सादर करू शकला नाही, ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सुनावणीअंती खंडपीठाने वरील आदेश दिला. या प्रकरणात अ‍ॅड. सागर लड्डा यांना अ‍ॅड. सत्यजित रहाटे, अंकित साबू , सन्नी खिंवसरा आणि गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.-------------

टॅग्स :Courtन्यायालयRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबाद