शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

पैठणमधून निवडणूक लढण्याचे राज ठाकरे यांना घातले साकडे !

By admin | Updated: July 20, 2014 01:00 IST

पैठण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक पैठण विधानसभा मतदारसंघातून लढवावी, असा प्रस्ताव मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी मांडला.

पैठण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक पैठण विधानसभा मतदारसंघातून लढवावी, असा प्रस्ताव मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी शनिवारी झालेल्या मनसेच्या आढावा बैठकीत वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला. या प्रस्तावाचे उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. बैठकीसाठी झालेली गर्दी व उत्साह पाहून मनसेचे वरिष्ठ नेते सुखावले. मनसेचे विधानसभेतील गटनेते आ. बाळा नांदगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील माहेश्वरी भवनच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मनसेचे संपर्क नेते सतीश नारकर, अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जि. प. बांधकाम सभापती डॉ. सुनील शिंदे, जि. प. सदस्या शीला विजय चव्हाण, पं. स. सदस्य विठ्ठल मोगल, कृष्णा गिधाने, पुष्पा रामनाथ केदारे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब सोलाट, शहराध्यक्ष संतोष जोशी, राजेंद्र तांबे, शिवाजी नरके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नारकर यांनी केले.पैठण तालुक्यात मनसेची ताकद मोठीमनसेची ताकद पैठण तालुक्यात आहे. दोन वेळेस विधानसभेच्या निवडणुकीत ही ताकद दिसून आली आहे. यंदा जोरदार प्रयत्नाने मनसेचा झेंडा तालुक्यात विधानसभेला फडकू शकतो. यासाठी कार्यकर्त्यांनी उत्साह टिकवून ठेवावा, असे आवाहन अविनाश अभ्यंकर यांनी केले. यादीत पैठण ए प्लस मतदारसंघपैठण विधानसभा मतदारसंघ मनसेच्या यादीत ‘ए प्लस’ असून या मतदारसंघास मनसे त्याच पद्धतीने ताकद देईल, असे आश्वासन बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिले. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघांत दौरा केला; परंतु असा उत्साह कोठे दिसून आला नाही, असेही ते म्हणाले.