शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

आंबेडकरांचे स्मारक उभारणार

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच वाटचाल करण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. जिल्ह्यातील कसबे-तडवळे येथे बाबासाहेबांचा पावनस्पर्श झाला आहे. त्यामुळे तेथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणाही यावेळी चव्हाण यांनी केली.कळंब नगर परिषदेच्या वतीने शहरातील पं. जवाहरलाल नेहरू बालोद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र भिख्खू संघाचे उपाध्यक्ष भंत्ते उपगुप्त महाथेरो, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, पं.स. सभापती छायाताई वाघमारे, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, माजी आमदार दयानंद गायकवाड, यशपाल सरवदे, दगडू धावारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, डॉ सुनील गायकवाड, ब्रिजलाल मोदाणी, जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, आप्पासाहेब शेळके, भागवत धस, पांडुरंग कुंभार, शिल्पकार निरंजन मडिलगेकर आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची चौकट बळकट करण्याचे कार्य राज्यघटनेच्या माध्यमातून केले. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना समान संधी देणारे ‘एक व्यक्ती, एक मत’ हे धोरण त्यांनी अवलंबिले. सर्वसामांन्या केंद्रबिंद मानून त्यांनी काम केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश त्यांनी दिला. या महामानवाचा पुतळा उभा करून कळंब नगर परिषदेने शहरवासियांची मागील पंचेवीस वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळत राहिल, असा विश्वास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)