शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'सुपर संडे' ला पावसाचा फटका

By admin | Updated: September 1, 2014 00:24 IST

नांदेड : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सुपर संडेचे आयोजन करण्यात आले होते़

नांदेड : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सुपर संडेचे आयोजन करण्यात आले होते़ परंतु रविवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले़ त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर नवीन नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद मिळाला़ रविवारी ३१ आॅगस्ट रोजी भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारयाद्यात नाव समाविष्ट करणे, किंवा फोटो नसेल तर फोटो तसेच अन्य नोंदी अद्ययावत करण्यासाठी सुपर संडेची संधी देण्यात आली होती़ यासंदर्भात शनिवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेवून मतदार जागृतीविषयी अधिक सतर्क आणि सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार होते़ रविवारी शहरातील मतदान केंद्र निहाय मतदार याद्यांतील आपल्या नावाची खात्री करून घेऊन, तपशील, फोटो याबाबत अद्ययावत करण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते़ मात्र प्रशासनाच्या या प्रयत्नावर पावसाने पाणी फेरले़ जिल्ह्यात गत पाच, सहा दिवसांपासून पावसाने चांगली सुरूवात केली आहे़ रविवारी मध्यरात्रीनंतर पाऊस सुरू झाला़ तो दिवसभर सुरूच होता़ त्यामुळे अनेक मतदारांना मतदान केंद्राकडे जाताच आले नाही़ त्यामुळे अपेक्षित नवीन नोंदणी होवू शकली नाही़ तरोडा खु़ भागातील मतदान केंद्र दूर असल्याने व त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांनी चिखलात जाण्याचे टाळले़ या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून या शाळेतील विद्यार्थ्यांनाही चिखलातून वाट काढत जावे लागते़ या केंद्रावर दिवसभरात केवळ ५ जणांनी मतदारयादीत नावनोंदणी केली़ तरोडा भागातील जवळपास सर्व केंद्रावर अशीच परिस्थिती आढळून आली़ यापुर्वी ज्यांनी मतदारयादीत नाव नोंदणी केली होती़ त्यांना आपले नावे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर यादी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ (प्रतिनिधी)