किनवट: गेल्या ३० ते ४० वर्षांत २७ आॅगस्टअखेर पावसाचा निच्चांक यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे़ पाऊसच नसल्याने नदी-नाले कोरडे असून खरीप हंगामही धोक्यात आला आहे़गेल्या २० वर्षांत २०१४ या वर्षात आॅगस्टच्या २७ तारखेपर्यंत केवळ २६१ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ पोळा सणाच्या एक दिवस अगोदर म्हणजे खानमाळनच्या दिवशी तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी बसल्या़ २५,२६ व २७ आॅगस्ट या तीन दिवसांत ६२ मि़मी़ पाऊस पडल्याची नोंद आहे़ यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने नदी-नाले कोरड्या अवस्थेत आहेत़ खरीप हंगामाच ीही केवळ ९३ टक्के क्षेत्रातच पेरणी झाली़ आॅगस्ट महिन्यात जे पीक असायला पाहिजे तशी परिस्थिती यंदा नसल्याने पोळा सणही शेतकऱ्यांनी कसाबसाच साजरा केला़ दुष्काळी परिस्थिती कायम असतानाही शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याची ओरड सुरू आहे़ (वार्ताहर)
किनवट तालुक्यात पावसाचा निच्चांक
By admin | Updated: August 30, 2014 00:00 IST