शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

पाच वर्षांत पावसाचा निच्चांक

By admin | Updated: July 22, 2014 00:20 IST

भास्कर लांडे, हिंगोली गतवर्षीच्या अगदी विपरित परिस्थिती जिल्ह्यात असल्याने यंदा मृग नक्षत्रास दीड महिना उलटून देखील पावसाच्या सरासरीला शंभरी देखील ओलांडता आलेली नाही.

भास्कर लांडे, हिंगोलीगतवर्षीच्या अगदी विपरित परिस्थिती जिल्ह्यात असल्याने यंदा मृग नक्षत्रास दीड महिना उलटून देखील पावसाच्या सरासरीला शंभरी देखील ओलांडता आलेली नाही. परिणामी मराठवाड्यात आघाडीवर राहणारा हिंगोली जिल्हा पावसाच्या बाबतीत सर्वात मागे पडला. मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच पावसाने निच्चांक गाठला आहे. मराठवाड्यात नांदेडची साडेनऊशेच्यानंतर हिंगोली जिल्ह्याची ८९२ मिमीची सरासरी असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडतो. मागील पाच वर्षांत वार्षिक सरासरी ओलांडली नाही असे कधी झालेले नाही. पावसाची अवकृपा कधीही झाली नसल्याने उत्पादनाच्या बाबतीत जिल्हा नेहमी आघाडीवर असतो. २०१२ साली सोयाबीन उत्पादन्नाच्या सरासरीने मराठवाड्यात आघाडी घेतली होती. सोयाबीनसोबत सर्वच पिकांचे भरघोस उत्पन्न पावसाच्या सरासरीत दडले होते. २०११ वर्षीच्या ४२ दिवसांवरून २०१२ साली ५९ दिवस पाऊस झाल्याने पिकांजोगे पाणी पडल्याने भरघोस उत्पन्न आले होते. २०१२ वर्षी आजघडीला २४४ मिमी पाऊस झाला होता. तेव्हा सेनगाव वगळता सर्व तालुक्यांत २०० मिमीच्या पुढेच पावसाची सरासरी होती. तत्पूर्वी २०१० आणि २०१३ वर्षी बरोबर ५५० मिमी पाऊस झाला होता. दरम्यान तीन वर्षांत वरूणराजाने कधीही नाराज केले नाही. विशेष म्हणजे चार वर्षांत मृग नक्षत्रात मान्सून पावसाचे आगमन झाले होते. गतवर्षी मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात १२ जून रोजी जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. मराठ्यात सर्वात उशिराने हिंगोलीत दाखल झालेल्या या पावसाने मागील दहा वर्षांचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. पावसाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे एक झाले होते. संपूर्ण हंगामात १ हजार ४०० मिमी पाऊस झाला होता. आजघडीला गतवर्षी सेनगाव वगळता सर्व तालुक्याने ५०० मिमीची सरासरी ओलांडली होती. प्रामुख्याने त्यात औंढा तालुक्यात ६५५ मिमी सर्वाधिक पाऊस झाला होता. यंदा गतवर्षीच्या उलट स्थिती उद्भवल्याने पावसाच्या आगमनासाठी प्रार्थना करावी लागली. मागील वर्षी यावेळेला शेतकरी कोळपणी तसेच निंदणी, फवारणी करीत होते. यंदा एका महिन्याच्या उशिराने जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. त्यातही सातत्य राहिले नसल्याने सुरूवातीच्या तीन दिवसानंतर मधील दोन दिवसांत पाऊस गायब झाला. आता पुन्हा मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे; परंतु जीव नसल्यासारखा पाऊस जिल्ह्यात होत असल्याने सरासरीचे शतक देखील झालेले नाही. एकाही दिवसी १० मिमीच्या पुढे पाऊस झालेला नाही. सकाळपासून रिमझिम लावत असलेला पाऊस रात्रभर कायम राहूनही नाल्यादेखील वाहत नाहीत. विशेषत: कळमनुरी तालुक्यात अद्यापही ५० मिमी पाऊस झालेला नाही. परिणामी मागील पाच वर्षांत सर्वात कमी पाऊस झाला. त्याचा फटका जिल्ह्यातील उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. कारण महिन्याच्या उशिराने खरीप हंगामाच्या पेरण्याला सुरूवात झाली. आजपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार केवळ १७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुरेशा पाण्याअभावी पेरलेले बियाणे उगवण्याची शक्यता कमी असल्याने जिल्ह्यातील उत्पादक पावसासाठी धावा करीत आहेत. मराठवाड्यात नांदेडची साडेनऊशेच्यानंतर हिंगोली जिल्ह्याची ८९२ मिमीची सरासरी असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस पडतो. पावसाची अवकृपा कधीही झाली नसल्याने मागील पाच वर्षांत वर्षीक सरासरी ओलांडली नसल्याचे कधी झालेले नाही. २०११ वर्षीच्या ४२ दिवसांवरून २०१२ साली ५९ दिवस पाऊस झाल्याने पिकांजोगे पाणी पडल्याने भरघोस उत्पन्न आले होते. २०१२ वर्षी आजघडीला २४४ मिमी पाऊस झाला होता. तेव्हा सेनगाव वगळता सर्व तालुक्यांत २०० मिमीच्या पुढेच पावसाची सरासरी होती. गतवर्षी मृगनक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात १२ जुन रोजी जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. संपूर्ण हंगामात १ हजार ४०० मिमी पाऊस झाला होता. मागील तीन दिवसांपासून जीव नसल्यासारखा पाऊस जिल्ह्यात होत एकाही दिवसी १० मिमीच्या पुढे पाऊस झाला नसल्याने गाठता आले नाही सरासरीचे शतक.