शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन, जाफराबाद, मंठ्यात अवकाळी पाऊस

By admin | Updated: May 1, 2017 00:34 IST

जालना: भोकरदन, जाफराबाद व मंठा तालुक्यातील काही गावांना वादळीवाऱ्यासह रविवारी अवकाळी पावसाने दणका दिला.

जालना: भोकरदन, जाफराबाद व मंठा तालुक्यातील काही गावांना वादळीवाऱ्यासह रविवारी अवकाळी पावसाने दणका दिला. अवकाळीमुळे कांदा, फळ पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. वादळामुळे अनेक घरावरील पत्रे तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जिल्ह्यात यंदा तापमानाने उच्चांक गाठून ४२ अंशांचा आकडा पार केला. उकाड्यामुळे नागरिक असह्य होत आहेत. त्यातच रविवारी दुपारपासून अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस पडेल असा अंदाज होता. मात्र भोकरदन, जाफराबाद व मंठा तालुक्यातील काही गावांना अवकाळीने जोरदार तडाखा दिला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, दानापूर, आन्वा आदी गावांत सुमारे तासभर वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. विजेचा कडकडाटही होता. जाफराबाद शहर व परिसरातही पाऊस पडला. मंठा तालुक्यातील उस्वद परिसरात अवकाळीने हजेरी लावली.वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे तसेच झाडे उन्मळून पडली. अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.विवाह समारंभाची दाणादाणभोकरदन तालुक्यात ३० एप्रील रोजी सांयकाळी ७ वाजेच्या दरम्यान अचानक बेमोसमी पावसाला सुरूवात झाल्यामुळे सायंकाळी असलेल्या विवाह समारंभाची मोठी दाणादाण झाली.तालुक्यात पावसाचे वातावरण नसताना ७ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे तालुक्यातील सायंकाळच्या विवाहसमारंभामध्ये मोठी तारांबळ उडाली होती. तर काही ठिकाणी वातावरण बघून तात्काळ विवाह समारंभ उरकण्यात आले. मात्र स्वयंपाकाची मोठी नासाडी झाली तर सभामंडप पडल्यामुळे वऱ्हाडी मंडळीनी विवाह समारंभातून काढता पाय घेऊन जागा मिळेल त्या ठिकाणी आधार घेतला. तालुक्यातील भोकरदन, हसनाबाद, कुंभारी, केदारखेडा, राजूर, भायडी, दानापूर, आलापूर, आन्वा, जळगाव सपकाळ, पारध, पिंपळगाव रेणुकाई, वाकडी, वाडी, फत्तेपूर, सिपोरा बाजार, निंबोळा, वडशेद, करजगाव, कल्याणी, सुरंगळी, देहेड, आव्हाना, गोकुळ, मनापूर, मलकापूर, बरंजळा साबळे या भागात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पाऊस व वाऱ्यामुळे चालकांना रस्त्यावरून वाहने चालविणे सुध्दा कठीण झाले होते त्यामुळे काही वेळ वाहने सुध्दा थांबवावी लागली होती़एकूणच अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यात मोठे नुकसान झाले नसले तरी विवाह समारंभात वऱ्हाडी मंडळीचे मोठे हाल झाले. (प्रतिनिधी)