शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅन्समवेअर’चा धसका; लातूरचा सायबर सेल अलर्ट !

By admin | Updated: May 19, 2017 00:04 IST

लातूर : रॅन्समवेअरच्या हल्ल्याची धास्ती जगभर असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानेही सतर्कतेचे आवाहन सायबर सेलला केले आहे.

राजकुमार जोंधळे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअरनंतर सुरक्षेचे सारे उपाय योजले जात आहेत. रॅन्समवेअरच्या हल्ल्याची धास्ती जगभर असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानेही सतर्कतेचे आवाहन सायबर सेलला केले आहे. यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल अलर्ट झाला आहे.जगभर रॅन्समवेअरच्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ‘नेट’कऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे. बनावट मेलच्या माध्यमातून असा हल्ला होण्याची शक्यता असल्याने संगणक हाताळणाऱ्यांनी अधिक दक्षता बाळगली पाहिजे. विशेषत: आॅनलाईन व्यवहार आणि इंटरनेटचा वापर करताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी आता लातूरच्या सायबर सेलने नागरिकांना आवाहन केले आहे. बनावट मेलपासून नागरिकांनी सावधानता बाळगावी. शिवाय, अनोळखी मेल उघडू नये. या मेलला कुठलाही प्रतिसाद न देता ते डिलीट् करून टाकावेत. अनोळखी नावाने आलेला मेसेज आणि मेल हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक करू शकतो. विशेषत: मोबाईलवर आलेले मेसेज आणि आॅनलाईन खरेदीच्या नावाखाली करण्यात आलेल्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून आॅनलाईन खरेदी करताना आधार लिंकिंग अथवा एटीएम कार्ड क्रमांक किंवा पॅनकार्ड क्रमांक आणि इतर माहिती मागितली जाते. एखाद्या कंपनीच्या नावाखाली बनावट मेलही अशी माहिती मागविण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक मेल आणि मोबाईलवर आलेले मेसेज काळजीपूर्वक वाचून, खात्री करून त्यासंबंधीचे व्यवहार करणे अधिक फायद्याचे ठरेल. रॅन्समवेअरच्या हल्ल्यानंतर जगभरासह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाअंतर्गत कार्यरत असलेला सायबर सेल अलर्ट झाला असून, त्यासंबंधीच्या सूचनाही लातूरच्या सायबर सेलला प्राप्त झाले आहेत.