परभणी/पूर्णा/पालम : परभणी शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहरात रात्री साडेआठवाजेपर्यंत काही भागात रिमझीम पाऊस सुरू होती.जिल्ह्यातील पूर्णा व पालम येथे गुरुवारी पाऊस झाला. यामध्ये पूर्णा शहरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दहा मिनिटे रिमझीम पाऊस झाला. तर पालम तालुक्यात गुरुवारी दुपारी काही गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. परभणी शहरातील काही भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील मानवत, पाथरी, गंगाखेड, जिंतूर, येलदरी, सेलू, पोखर्णी आदी भागात गुरुवारी पाऊस झाला नाही. (प्रतिनिधी)
तीन तालुक्यांत पाऊस
By admin | Updated: July 7, 2016 23:36 IST