लातूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. आतापर्यंत २०२ मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र प्रकल्प कोरडेच आहेत. ‘पाऊस थांबेना अन् पाणी दिसेना...’ अशी स्थिती लातूरची झाली आहे.जूनमध्ये लातूर तालुक्यात १२१.९, औसा १५१.२, अहमदपूर १६४.५, निलंगा २०९.०, उदगीर ११२.७, चाकूर २०७.४, रेणापूर ११२.९, शिरूर अनंतपाळ १८८.१, जळकोट १६३.० या प्रमाणात १५६.४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर जुलैमध्ये लातूर ३४.७, औसा २१.८, अहमदपूर ३८.८, निलंगा ३३.२, उदगीर ४३.८, चाकूर ५८.६, रेणापूर ७७.७, देवणी २७.७, शिरूर अनंतपाळ २५.३, जळकोट ४५.० या प्रमाणात ३९.२ मि.मी. पाऊस झाला आहे. असा एकूण ११ जुलैअखेर २०२ मि.मी. पाऊस झाला आहे.
लातुरात पाऊस थांबेना अन् पाणी दिसेना..!ं
By admin | Updated: July 12, 2016 00:57 IST