शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारे अन् गारांचा पाऊस...

By admin | Updated: May 11, 2016 00:24 IST

लोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

मोघा, नागराळ, बेंडकाळ, सालेगावला झोडपले : महाविद्यालयासह अनेकांच्या घरांचे नुकसानलोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे लोहाऱ्यातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. एकही पत्रा जागेवर राहिलेला नाही. त्याचप्रमाणे तहसील कार्यालय परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले. तर सालेगाव परिसराला गारांच्या पावसाने झोडपले. जवळपास वीस मिनिटे झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.लोहारा शहरासह परिसरातील सालेगाव, नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांत मंगळवारी दुपारी साडेचार सुमारास अचानक वादळी वारे सुरु झाले. हे वारे प्रचंड वेगाने वाहत होते. वादळी वाऱ्यासह जवळपास वीस ते पंचेविस मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण कांबळे, रसुल फकीर, सुखदेव रोडगे आदींच्या घरांवरील पत्रे उडाली. तसेच तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या महेबूब शेख यांच्या हॉटेलसमोरील पत्र्याचा निवाराही उडून गेला. तसेच याच परिसरातील काहीजणांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतामध्ये कडब्याच्या गंजी लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील गंजीही उडून गेल्या. त्यामुळे कडब्याचे मोठे नुकसान झाल्याचे सुरेश झिंगाडे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले. लोहारा शहरातील तहसील कार्यालयाच्या समोरील बाजूस असणाऱ्या शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वर्गखोल्या पत्र्याच्या शेडच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. या शेडचा एकही पत्रा जागेवर राहिला नाही. जवळपास सात ते आठ वर्गखोल्यांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. जाग्यावर राहीले ते बसण्याचे बाकडे. दरम्यान, वादळी वारे व पाऊस थांबल्यानंतर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उडून गेलेले पत्रे जमा केले. तहसील कार्यालयामध्ये सौरदिवे बसविण्यात आलेले आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील सौरदिव्यांचे खांबही उन्मळून पउले आहेत. त्याचप्रमाणे येथीलच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोरील बाजूला असलेली पानटपरीही वाऱ्यामुळे आडवी झाली. सालेगाव परिसरात मात्र वादळी वाऱ्यासोबतच गारांचा पाऊस झाला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटेच गारा बसरत होत्या. यामुळे सहदेव मातोळे, दगडू पांडुरंग बलसुरे यांच्या कडब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शिवारातील काही ठिकाणची झाडेही उन्मळून पडली आहेत. तसेच कमलाकर यादव, श्रीमंत मातोळे यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)पंधरा मिनिटे बरसल्या गारा : तहसील परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले