शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

‘रहेमत की बारीश अदा फरमा’

By admin | Updated: July 19, 2015 00:27 IST

बीड : पवित्र रमजान ईद शनिवारी जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढावलेले असल्यामुळे

बीड : पवित्र रमजान ईद शनिवारी जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढावलेले असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी पावसासाठी अल्लाहकडे ‘रहेमत की बारीश अदा फरमा’ अशी विनवणी केली. वैश्विक शांततेसाठीही दुवा मागितली.शहरातील किल्ला मैदान जामा मस्जिद, नवीन इदगाह बालेपीर येथे मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी नमाज अदा केली. यावेळी काझी फैजद्दुल्ला यांनी मार्गदर्शन केले. मर्कज मस्जिद, इस्लामपुरा इदगाह, दर्गाह मस्जिद बालेपीर, जामा महेबूबिया मस्जिद शाहूनगर, कादरपाशा मस्जिद जुना बाजार, केजीएन मस्जिद शहेंशाहनगर, दर्गाह शहेंशाहवली मस्जिद आदी ठिकाणी नमाज अदा करून दुवा मागण्यात आली.यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपअधीक्षक गणेश गावडे, रा. काँ. जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, माजी आ. राजेंद्र जगताप, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, प्रा. सुशीला मोराळे, बाबूराव दुधाळ, डॉ. योगेश क्षीरसागर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, सहायक निरीक्षक एम. ए. सय्यद, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुभाषचंद्र सारडा आदींनी शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आ. सय्यद सलीम, सिराजोद्दीन देशमुख, अ‍ॅड. शेख शफीक, खालेक पेंटर, मोईन मास्टर, शेख फारूक, उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, शेख मुसा, शाहेद पटेल, अ‍ॅड. इरफान बागवान आदी उपस्थित होते.गेवराईतही पावसासाठी दुवायेथील ईदगाह मैदानावर ईदनिमित्त नमाज अदा करून पाऊस व शांततेसाठी दुवा मागितली. यावेळी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती. आ. अ‍ॅड. लक्ष्मण पवार, आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष महेश दाभाडे, जि. प. सदस्य युधाजित पंडित, उपअधीक्षक राजकुमार चाफेकर, निरीक्षक सुरेंद्र गंधम, नायब तहसीलदार कल्याण जगरवाल, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, शेख जमादार, याहिया खान, रोहित पंडित, हन्नान इनामदार यांची उपस्थिती होती. उमापूर, चकलांबा, तलवाडा येथेही ईद साजरी करण्यात आली.धारूर, शिरूर, पाटोदा, परळी, अंबाजोगाई, वडवणी, केज, माजलगाव, आष्टी येथेही ईद उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांना सर्व जातीधर्माच्या लोकांनी शुभेच्छा दिल्या.मुस्लिम बांधवांनी घरोघर गोडधोड पदार्थ, शिरखुर्मा, गुलगुले तयार केले होते. नवीन पोषाख परिधान करून लहानांपासून मोठ्यापर्यंत एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देत होते. (प्रतिनिधी)