शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोतील खाबूगिरी प्रशासनाच्या रडारवर

By admin | Updated: May 21, 2017 23:51 IST

बीड : जिल्ह्यात कागदावर मजूर दाखवून मग्रारोहयोमध्ये खाबूगिरी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीतच उघडकीस आले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात कागदावर मजूर दाखवून मग्रारोहयोमध्ये खाबूगिरी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीतच उघडकीस आले आहे. त्यामुळे मग्रारोहयो गावपुढाऱ्यांसाठी कुरण बनल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेतील बोगसगिरी प्रशासनाच्या रडारवर असून, तक्रार आल्यास कारवाई अटळ आहे. त्यामुळे बोगसगिरी करणाऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या मग्रारोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी बीड तालुक्यातील नेकनूर, कळसंबर, भंडारवाडी येथील कामांना दिलेल्या पाहणीदरम्यान अनियमितता आढळून आली. त्यानंतर भागवत यांनी गटविकास अधिकारी रवींद्र तुरूकमारे यांना संबंधित गावांमध्ये आढळलेल्या अनियमिततेनुसार कारवाईचे आदेश दिले आहेत.दुसरीकडे अंबाजोगाईत देखील तहसीलदार शरद झाडके यांनी मग्रारोहयोच्या कामांची झाडाझडती घेतली. तेथेही ७० गावांमध्ये मजूर नसल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे मस्टरवर शेकडो मजुरांची नोंद असताना कामावर मात्र एकही मजूर नसल्याने रोहयोतील खाबूगिरी उघड झाली आहे. त्यांनी देखील कारवाईचा प्रस्ताव दिलेला आहे.जिल्ह्यात आजघडीला १२०० हून अधिक कामे सुरू असून, त्यावर ४१ हजारांपेक्षा मजूर कामाला असल्याची नोंद आहे. एका मजुराला २०० ते २५० रूपये मजुरी दिली जाते. कागदोपत्री मजूर दाखवून शासन निधीवर डल्ला मारला जात असल्याने मग्रारोहयोमध्ये मागचाच कित्ता पुन्हा गिरवला जात असल्याचे समोर आले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी सर्व अनियमिततेची माहिती मागविली आहे. त्यामुळे अनियमितता करणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत.