शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रोष अन् उद्रेक...!

By admin | Updated: May 22, 2017 23:33 IST

बीड : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केज, अंबाजोगाई, शिरूर वगळता इतर ठिकाणी व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. तिडकेच्या वक्तव्याबद्दल सामान्यांत प्रचंड संताप अन् उद्रेक दिसून आला. बंददरम्यान बीडमध्ये १५ ठिकाणी तोडफोड झाली. हिंसक वळण मिळाल्याने बंदला गालबोट लागले. रॅलीतील तरुणांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी शंभरावर कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद केले असून अनेकांची धरपकड केली. विठ्ठल तिडकेच्या अटकेमुळे सोमवारचा बंद शांततेत होईल, असा पोलीस प्रशासनाचा अंदाज संतप्त तरुणांनी फोल ठरविला. सर्व पक्ष- संघटनांचे पदाधिकारी- कायकर्ते बंदमध्ये सहभागी झाले होते. सकाळपासूनच अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूतीने बंदमध्ये सहभाग नोंदविला. सकाळी ११ वाजता तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. कोणा एकाच्या नेतृत्वाशिवाय निघालेल्या या रॅलीतील तरुणांनी संपूर्ण शहराला वळसा घालून बंदचे आवाहन केले. रॅली सुभाष रोडवर आल्यानंतर काही कार्यकर्ते वेगवेगळ्या दिशेने गेले. त्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांचा पाठलाग केला. शहरात एकूण २५ ठिकाणी पोलिसांचे पॉर्इंट लावण्यात आले होते. याशिवाय फिरते गस्त पथकही हालचालींवर लक्ष ठेवून होते. शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे, पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव बंदोबस्तकामी रस्त्यावर उतरले होते. अधीक्षक जी. श्रीधर हे देखील बारीकसारीक माहिती जाणून घेत परिस्थिती नियंत्रणात आणत होते. दरम्यान, शहरातील सर्व भागांतील दुकाने सायंकाळपर्यंत बद होती. दगडफेकीच्या घटनेनंतर सर्व रस्ते सूनसान होते. सायंकाळनंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले.