शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईमध्ये धाडसी चोरी

By admin | Updated: July 3, 2017 00:55 IST

अंबाजोगाई : शहरातील यशवंतराव चव्हाण चौकलगतच्या अमृत नगरमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ जगदीशराव देशपांडे यांच्या घरी चोरी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शहरातील यशवंतराव चव्हाण चौकलगतच्या अमृत नगरमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ जगदीशराव देशपांडे यांच्या घरी चोरी झाली. यामध्ये पावणेचार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. भरवस्तीत ही चोरी झाल्याने अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे. यशवंतराव चव्हाण चौकालगतच्या अमृतनगर या गजबजलेल्या कॉलनीमध्ये जगदीशराव देशपांडे यांचे घर आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीची जाळी काढून खोलीत प्रवेश केला. त्यानंतर खोली आतून बंद केली. त्याच खोलीतील कपाट उघडून त्यातील चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, तीन तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे गंठन, तीन तोळ्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे लहान मुलाचे लॉकेट आणि बदाम, कानातील सोन्याच्या काड्या, दीड तोळ्याचा वेल, सरपाळी आणि ठुशी इतर चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ६७ हजार २८२ रूपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी सकाळी पाच वाजता जगदीश देशपांडे फिरायला जाण्यासाठी निघाले असता कपडे घेण्यासाठी सदरील खोली उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु आतून बंद असल्याने दरवाजा उघडला नाही. नंतर त्यांनी मागच्या बाजूने पाहिले असता त्यांना हा प्रकार समोर दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते, सहायक पोलीस निरीक्षक नाईकवाडे, उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु विशेष काही हाती लागले नाही. याप्रकरणी एसबीआय बँकेत अधिकारी असणारे मंदार जगदीशराव देशपांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.