शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी अडचणींची शर्यत

By admin | Updated: July 11, 2017 00:29 IST

औरंगाबाद : अडथळ्यांची शर्यत पार करताच यंदा शिक्षण विभागाला अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी मार्ग काढावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अडथळ्यांची शर्यत पार करताच यंदा शिक्षण विभागाला अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी मार्ग काढावा लागत आहे. शिक्षण विभागाचे सर्व्हर हँग झाल्यामुळे सोमवारी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप झाला. यावर्षी पहिल्यांदाच औरंगाबाद महापालिका क्षेत्रात इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली; पण सुरुवातीला काही दिवस सतत सर्व्हर हँग होत राहिल्यामुळे विद्यार्थी व पालकांना आॅनलाइन नोंदणीसाठी अडचणींचा सामना करावा लागला. पालकांची ही अडचण लक्षात येत शिक्षण संचालनालयाने आॅनलाइन नोंदणीसाठी २९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली व प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. शहरातील जवळपास ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जवळपास २२ ते २३ हजार प्रवेश क्षमता असली तरी प्रत्यक्षात अकरावीच्या प्रवेशासाठी १९ हजार ३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १ जुलैपासून ‘कोटा’ पद्धतीनुसार प्रवेश सुरू झाले. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वसाधारण प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. पण, रात्री उशिरापर्यंत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून यादी जाहीर होऊ शकली नाही. उद्या ११ ते १३ जुलैपर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीनुसार वाटप करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. १४ आणि १५ जुलैपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणाला जर महाविद्यालय किंवा विद्याशाखांचा पसंतीक्रम बदलावा वाटला तर ते बदलू शकतात. ज्यांना पसंतीक्रम बदलण्याची इच्छा नसेल, त्यांची प्रवेशासाठी पुढील गुणवत्ता यादीत नावे जाहीर होतील, असे शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी सांगितले.