शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

रबीला हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ कमी पाण्यावर उत्पादन देणारे हरभरा पीक असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली आहे़रब्बी हंगामामध्ये लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे सरासरी क्षेत्र १,८७,१६७ क्षेत्रापैकी सहा तालुक्यातील ४,१४७ हेक्टरवर रबी पिकाची पेरणी झाली़ यामध्ये ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई आदी पिकांचा समावेश आहे़ लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभरा, ७५ हेक्टरवर ज्वारी व १२ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी झाली़ औसा तालुक्यामध्ये २० हेक्टरवर ज्वारी, ३० हेक्टरवर मका, २१० हेक्टरवर हरभरा, ५ हेक्टरवर करडई, २ हेक्टरवर जवस, ५ हेक्टरवर सुर्यफुल व ३ हेक्टरवर इतर पिकाची पेरणी करण्यात आली़ चाकूर तालुक्यात ६९ हेक्टरवर ज्वारी, २६ हेक्टरवर मका, २ हेक्टरवर गहू, १२ हेक्टरवर करडई याप्रमाणात रबी पिकाची परेणी करण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, २५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई व ७ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करण्यात आली़ शिरुर अनंतपाळ तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, १५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई तर ९ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करतण्यात आली़ रेणापूर तालुक्यात ५९० हेक्टरवर ज्वारी २,१२६ हेक्टरवर हरभरा, ७७१ हेक्टरवर करडई या प्रमाणात ४,१४७ हेक्टर क्षेत्रावर रबीची पेरणी करण्यात आली़ यामध्ये ज्वारी, गहु, सुर्यफुल, करडई, हरभरा आदी पिकामध्ये ३६९ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ तर जळकोट, अहमदपूर, देवणी व उदगीर या तालुक्यात मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अद्यापही पेरण्या निरंक आहेत़ (प्रतिनिधी)रबी हंगामामध्ये अल्पशा पावसावर ६ तालुक्यात ४१४७ हेक्टरवर पेरण्या झाल्या़ परंतु उर्वरित ४ तालुक्यातील पेरण्या मात्र निरंक आहेत़ परंतु पेरणीचा कालावधी १५ नोव्हेंबर पर्यंतचा असल्याने शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ यासाठी खरीप व रबी हंगामासाठी १०० मिलीमिटर पावसाची गरज आहे़रबी हंगामात ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई, मका व इतर कडधान्य पिकामध्ये हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक झाला आहे़ यामध्ये औसा तालुक्यात २१०, चाकूर तालुक्यात २३१, निलंगा तालुक्यात २५, शिरुर अनंतपाळ तालुक्यात २५, लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली़ तर रेणापूर तालुक्यात २१२६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाल्याने रेणापूर तालुक्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाल्याचे समोर आले आहे़