शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या समस्येमुळे रबी हंगाम धोक्यात

By admin | Updated: January 1, 2017 23:56 IST

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे.

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे. परिणारमी या ३३ केव्हीमधून मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या वाढल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. वीज जोडणीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.राणीउंचेगाव येथील ३३ केव्हीच्या उपकेंद्राला अंबड येथील १३२ केव्ही मधून वीज पुरवठा होत आहे. परंतु अंबड १३२ केव्हीमधून गोलापांगरी, शेवगा आणि हिस्वन अशा तीन ३३ केव्हीला वीज पुरवठा होऊन शेवटी राणीउंचेगाव ३३ केव्हीला वीजपुरवठा होत असल्याने या ३३ केव्हीला विजेचा पुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. यामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. शेतीचे कृषीपंप कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे चालत नाही. रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत असल्याने रबी हंगााम धोक्यात आला आहे.राणीउंचेगाव ३३ केव्ही अंतर्गत परिसरातील तळेगाव, मानेपुरी, राठी अंतरवाली, चापडगाव, शिंदे वडगाव, पानेवाडी, गुरूपिंप्री, भुतेगाव, दाई अंतरवाली, शेवगळ, सरफगव्हाण, निपानी पिंपळगाव, मंगू जळगाव, रवना, कृष्णनगर, मुढेगाव, पानेगाव, आवलगाव आदी २२ गावे जोडण्यात आली आहे.राणीउंचेगाव ३३ केव्हीमधून क्षमतेपेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा होत असल्याने विजेच्या अनेक समस्या वाढल्या. यामुळे भुतेगाव येथे ३३ केव्ही दुसरे उपकेंद्र मागील एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. यामुळे राणीउंचेगाव ३३ केव्हीमधील भुतेगाव, पानेवाडी, दाई अंतरवाली आणि कारला परिसराचा काही भाग भुतेगावला जोडण्यात आला भुतेगावला घनसावंगी १३२ केव्हीमधून वीज पुरवठा जोडला आहे. घनसावंगी १३२ केव्हीमधून राणीउंचेगाव लाही वीज पुरवठा जोडला जाणार आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी फक्त ७ पोलचे अंतर आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भुतेगाव ३३ केव्हीच्या उदघाटन कार्यक्रमात वीज वितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी राणीउंचेगावला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून पाच दिवसामध्ये वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, असे शेतकऱ्यांना सांगितले. परंतु हा वीजपुरवठा अद्यापही जोडला गेला नाही. यामुळे शेतकरी विजेच्या समस्येने हैराण झाले आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)