शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांना ‘अडसर’ ठरणाºया दुलारी कुरेशींना हेरिटेज कमिटीतून केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:49 IST

शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे पाडण्याच्या महापालिकेच्या मोहिमेला वेळोवेळी विरोध करणाºया इतिहास अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांना बुधवारी (दि.२३) मनपाच्या ‘हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी’तून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळे पाडण्याच्या महापालिकेच्या मोहिमेला वेळोवेळी विरोध करणाºया इतिहास अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांना बुधवारी (दि.२३) मनपाच्या ‘हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी’तून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या धोरणाला अडसर ठरत असल्यामुळेच डॉ. कुरेशी यांच्यासारख्या खºया इतिहासप्रेमींना कमिटीतून वगळण्यात आल्याची चर्चा आहे.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील हेरिटेज वास्तंूच्या संवर्धनासाठी ‘औरंगाबाद वारसा संवर्धन समिती’ गठीत केली होती. या समितीमध्ये दुलारी कुरेशी सदस्य आहेत. एकाच वेळी दोन समित्यांमध्ये सदस्य राहता येत नसल्याचा तथाकथित नियम सांगून कुरेशी यांना मनपाच्या हेरिटेज कमिटीमधून काढण्यात आले.दुलारी कुरेशी विभागीय पातळीवरील मोठ्या समितीमध्ये सदस्या असल्याने त्यांना मनपाच्या निम्न स्तरावरील समितीमधून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समित्यांचा उद्देश एकच असल्याने त्या आम्हाला वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन करतील, असे जयंत देशपांडे यांनी सांगितले.एप्रिल महिन्यात रातोरात खास गेट पाडल्यानंतर दुलारी कुरेशीसह शहरातील तमाम इतिहासप्रेमींनी कँडल मार्च काढून मनपा व हेरिटेज कमिटीच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले होते. तेव्हापासून देशपांडे यांना कुरेशी नको होत्या. दमडी महल पाडणे, हेरिटेज कमिटीच्या बैठका न होणे, सदस्यांना निर्णयांमध्ये सहभागी करून न घेणे, अशा मनमानी कारभारावर कुरेशी यांनी नेहमीच टीका केली होती.