शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: November 8, 2015 23:42 IST

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर उदगीर शहरासाठी लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याची प्रस्तावित योजना गेल्या अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे़

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर उदगीर शहरासाठी लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याची प्रस्तावित योजना गेल्या अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे़ या प्रकल्पातील पाणी उदगीर शहरासाठी देणे शक्य नसल्याचे सांगून जलसंपदा विभागाने हात झटकले असतानाही ही योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी व उदगीर नगरपरिषदेकडून पाठपुरावा सुरुच आहे़ उदगीर शहरासाठी नांदेड जिल्ह्यातील मन्याड नदीवर बांधण्यात आलेल्या लिंबोटी प्रकल्पातील पाणी मिळवण्यासाठी नगरपरिषदेने २००९-१० मध्ये प्रस्ताव सादर केला होता़ मात्र, या प्रकल्पातील पाणी कंधार-अहमदपूर व लोहा या तालुक्यातील गावांसाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे उदगीर शहरासाठी या प्रकल्पातील पाणी मिळणार नसल्याचे जलसंपदा विभागाने फेब्रुवारी २०११ मध्ये नगरपरिषदेस कळवून हात झटकले होते़ १२५ कोटी रुपयांची ही योजना तयार करण्यात आली होती़ या योजनेतून ६५ कि़ मी़ लांबीची पाणी वितरण व्यवस्था उभारण्यात येणे अपेक्षित होती़ राज्याच्या तत्कालिन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांना उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी लिंबोटी प्रकल्पातून उदगीर नगरपरिषदेच्या वाढीव पाणी आरक्षण प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याच्या बाबतीत मागणी केली असता राज्याच्या या विभागाच्या कक्ष अधिकारी गौरी पवार यांनी जलसंपदा विभागास कार्यवाही करण्याचे आदेश आॅगस्ट २०१३ मध्ये दिले होते़ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २७ नोव्हेंबर २०१४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत आ़ भालेराव यांनी लिंबोटी प्रकल्पातील पाणी उदगीर शहरासाठी आरक्षित करण्याचा प्रश्न उपस्थित केला असता उदगीर नगरपरिषदेने पाणी आरक्षणाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पुर्नसादरीकरणाचे आदेश दिले़ शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी अपेक्षित यश मिळत नसल्याने नागरिकांची भटकंती होत आहे़