शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कडबा महागल्याने सव्वाआठ लाख गुरांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: July 14, 2015 00:51 IST

राजेश खराडे , बीड पावसाने ओढ दिल्याने आठ दिवसाच्या कालावधीतच कडब्याचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांकडून लागेल तेवढ्याच कडबा चाऱ्याची खरेदी केली जात

राजेश खराडे , बीड पावसाने ओढ दिल्याने आठ दिवसाच्या कालावधीतच कडब्याचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांकडून लागेल तेवढ्याच कडबा चाऱ्याची खरेदी केली जात आहे. हिरवा चारा तर दुरापास्तच झाला आहे. ऐन पावसाळ्यातही हिरवा चारा तर सोडाच वाळलेला कडबा देखील मिळने मुश्किल झाले आहे. आठ दिवसापुर्वी १४०० रुपये शेकडा कडब्याचे दर होते. सबंध आठवडा जिल्ह्यात पावसाचा थेंबही न पडल्याने भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी कडबा खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. परिणामी आवक घटल्याने कडब्याचे दर सध्या अडीच ते तीन हजाराच्या घरात गेले आहेत. जिल्ह्यातून तर कोणत्याच चाऱ्याची आवक होत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना उस्मानाबाद, भूम, परंडा तर सोलापूर, बार्शी या ठिकाणाहून आयात करावी लागत असल्याचे येथील व्यापाऱ्याने सांगितले. दिवसाला येथील बाजारपेठेत ३ ते ४ हजार कडब्याची आवक होत आहे. मात्र ठोक व्यवहार तर बंद झाले आहेत. शेतकरीही लागेल तसे कडब्याची खरेदी करीत आहे. हिरव्या चाऱ्याची तर बाजारपेठच बंद झाली आहे. चाराच शिल्लक नाही जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातून चाऱ्याची आवक होत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना इतर जिल्ह्यातून मागणी करावी लागत आहे. वाहतूकीस होणाऱ्या खर्चाचा परिणाम देखील चाऱ्याच्या दरावर झाला आहे. वाहतूकीच्या खर्चाचा परिणाम पावसाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध असतो. मात्र यंदा भयावह परिस्थती निर्माण झाल्याने पावसाळ्यातही चारा नसल्याने जनावर दावनीला बांधण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे बांधून असल्याने दिवसाला एका जनावरास ५ ते ६ कडब्याच्या पेंड्या लागत आहेत. पाऊस पडेल या आशेने आठवडाभर पुरेल एवढ्याच चाऱ्याची खरेदी करीत असल्याचे शेतकरी अशोक गर्जे यांनी सांगितले.