१९६३ साली ज्या उद्देशाने महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. तो उद्देश सध्या फोल ठरल्याचा खेद राज्याचे कृषी व पणन संचालक सुभाषराव माने यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केला. शेतकऱ्यांनी माल यार्डात आणल्यानंतर २४ तासात त्याचे पेमेंट झाले पाहिजे, मात्र बाजार समित्या हा नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे माने यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगला भाव मिळण्यासाठी ग्रेडींग करून आॅक्शन झाले पाहिजे. त्यासाठी बाजार समित्यांनी अधिक सक्रीय होऊन कामात सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगून शेतमालाची वाताहात व नुकसान टाळण्यासाठी शेड वाढवावेत, असेही ते म्हणाले.
बाजार समित्यांचा उद्देश फोल ठरतोय
By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST