शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांना पिण्यासाठी मिळणार शुध्द पाणी

By admin | Updated: May 30, 2017 00:27 IST

तुळजापूर :भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिरासमोर मिनिरल वॉटर सेंटर उभारण्याचा ठराव पालिकेच्या सभेत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कतुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक तुळजापुरात येतात. या भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिरासमोर मिनिरल वॉटर सेंटर उभारण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तुळजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी प्रभारी नगराध्यक्ष पंडीतराव जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली. या सभेस अध्यक्षांसह १५ नगरसेवक उपस्थित होते. तर सात नगरसेवकांची अनुउपस्थिती होती. सुमारे दीड तास चाललेल्या या सभेत प्रारंभी मागील १० मार्च रोजीच्या बैठकीतील वृत्तांत वाचून कायम करण्यासाठी मतदान घेण्यात आले. १२ विरुध्द ३ मतांनी हा विषय पारित झाल्यानंतर २० एप्रील नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यास व राज्यसरकारने नगरपरिषदांना प्रोत्साहन लागू केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे वास्तव्य असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु, अनेक वेळा पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांना हॉटेल्सचा किंवा विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन भाविकांसाठी पिण्याचे शुध्द उपलब्ध करून देण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती तुळजाभवानी मंदीरासमोरील जागेत ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मिनिरल वॉटर सेंटर उभारण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामुळे भाविकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. वार्ड निहाय स्वच्छता कामाच्या ठेक्यास मुदतवाढ देण्याबाबतही या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. शहरातील प्राचिन मंकावती कुंडातील गाळ काढणे, महिलांकरिता चेंजिंग रूमची सुविधा व्हावी या उद्देशाने खोलीचे बांधकाम करणे, हे विषय तुळजापूर शहर विकास प्राधिकरणात प्रस्तावित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चालू आर्थिक वर्षात २०१७-०१८ चा फुटपाथ कर रद्द करण्याचा ठरावही सर्वानुमते पारित झाला. आॅनलाइन बांधकाम परवान्यासाठी अद्ययावत संगणक खरेदी करणे, १० मार्च १९९३ नंतरचे रोजंदारी व एकत्रित मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करणे, सन २०१७-१८ चे तुरटी, ब्लिचिंग खरेदी करण्यास कार्योत्तर मान्यता, आदी तेरा ठराव यावेळी घेण्यात आले. या सभेस संतोष परमेश्वर (कदम), वैशाली कदम, रेश्मा कदम, अश्विनी रोचकरी, शारदा भोसले, सचिन पाटील, आरती इंगळे हे नगरसेवक गैरहजर होते.