शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पुणे राष्टhय निसर्गोपचार संस्थेसाठी एक हजार कोटींचा निधी देणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:00 IST

पुणे येथील राष्टÑीय निसर्गोपचार संस्थेच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च केला जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुणे येथील राष्टÑीय निसर्गोपचार संस्थेच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च केला जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक म्हणाले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘योगा विभागा’च्या उद्घाटनाकरिता औरंगाबादेत आले असताना त्यांनी लोकमतला सदिच्छा भेट दिली. लोकमतचे संपादक सुधीर महाजन आणि चक्रधर दळवी, सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई आणि लोकमत टाइम्सचे निवासी संपादक योगेश गोले यांनी त्यांचे स्वागत केले.महाराष्टÑ शासनाने पुणे येथे २५ हजार चौरस मीटर जागा दिली आहे. तेथे २०० खाटांचे निसर्गोपचार रुग्णालय आणि योगा केंद्र टप्प्या-टप्प्याने विकसित केले जाईल, असे वरिष्ठ संपादकीय कर्मचाºयांशी बोलताना मंत्री नाईक म्हणाले.गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या खात्याच्या उपलब्धीबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही आयुर्वेद दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जागतिकस्तरावर २१ जून ‘योग दिन’ म्हणून स्वीकारला गेला आहे. ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’च्या धर्तीवर दिल्ली येथे ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदा’ची स्थापना करण्यात आली आहे. येथे आधुनिक तंत्रज्ञानासह आयुर्वेदिक उपचार आणि सर्व रोगांवरील संशोधनाची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे दररोज सुमारे १००० ते १२०० बाह्यरुग्ण उपचार घेतात. तसेच गोवा येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदा, योगा अ‍ॅन्ड नॅचरोपॅथी’ सुरू होत आहे.आयुर्वेदचे वैद्य आणि अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांमधील वादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले की, शिकल्याशिवाय कोणीही एखाद्या उपचार पद्धतीद्वारा उपचार कसा करू शकेल, असा उलट प्रश्न विचारून मंत्री म्हणाले की, आयुर्वेदिक पदवीधरांसाठी (वैद्यांसाठी) एक वर्षाचा ‘क्रॅश कोर्स’ सुरू करण्यात येत आहे. जेणेकरून आपत्कालीन वेळी आयुर्वेदिक वैद्य अ‍ॅलोपॅथिक उपचार करू शकतील. शासनाने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या पूर्ततेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही १०० टक्के पूर्ततेचा दावा करीत नाही; परंतु विकास होत आहे. आम्ही सध्या कृतीकार्यक्रम आखला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी वेळ लागू शकतो; परंतु आम्ही निश्चितच उद्दिष्टपूर्ती करू. पाच वर्षे आम्हाला काम करू द्या, नंतर कामाचे मूल्यमापन करा.