शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या जिल्हा न्यायाधीशांच्या गुप्त अहवालावरून जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST

जालना येथील मतिमंद बालगृह आणि शिशुविहार गृहात अनेक त्रुटीं औरंगाबाद : जालना येथील मतिमंद बालगृह आणि शिशुविहारगृहातील अनेक त्रुटींसंदर्भात ...

जालना येथील मतिमंद बालगृह

आणि शिशुविहार गृहात अनेक त्रुटीं

औरंगाबाद : जालना येथील मतिमंद बालगृह आणि शिशुविहारगृहातील अनेक त्रुटींसंदर्भात जालन्याच्या जिल्हा न्यायाधीशांनी उच्च न्यायालयात गुप्त अहवाल सादर केला होता. त्याची दखल घेत खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

खंडपीठाने ॲड. अक्षय कुलकर्णी यांची न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून नियुक्ती केली आहे. याचिकेवर २१ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

जालन्याच्या जिल्हा न्यायाधीशांनी ९ जानेवारी २०२० रोजी जालना येथील स्वर्गीय शंकरलाल मुंदडा मतिमंद बालगृह आणि स्वर्गीय रामकुवर रमेशचंद्र बंग शिशुविहारगृहाला अचानक भेट दिली. तेव्हा दोन्ही संस्थांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. याचा गुप्त अहवाल त्यांनी खंडपीठाला पाठविला होता.

सोमवारी (१४ डिसेंबर ) या सुमोटो जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान निदर्शनास आले की, वरील दोन्ही संस्थांनी आणि जिल्हा बालकल्याण समितीने बालकल्याणविषयक कायदा, नियम आणि दत्तक देण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केलेली नाही.

महिला व बालकल्याण आयुक्तांनी वरील संस्थाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना २५ सप्टेंबर २०२० च्या पत्राद्वारे दिल्या होत्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या विशेष पथकच्या तपासणीतही वरील संस्थांनी पूर्तता केली नसल्याचे आढळले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे, असे निवेदन सुनावणीदरम्यान मुख्य सरकारी वकील ॲड. डी. आर. काळे यांनी केले. महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ॲड. प्रज्ञा तळेकर केंद्र, शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल ए. जी. तल्हार काम पाहत आहेत.