शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:45 IST

बीड : ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी वडवणी, पाटोदा, माजलगाव, गेवराई व आष्टी शहरात ...

बीड : ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी वडवणी, पाटोदा, माजलगाव, गेवराई व आष्टी शहरात रविवारीदुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत पुरूष, महिलांसह युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. भगवे झेंडे, टोप्या अन् गळ्यातील रूमालांमुळे वातावरण भगवेमय झाले होते. चारही तालुक्यांमध्ये रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.वडवणी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी रविवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटार सायकल रॅली काढली. सकाळपासून मोटार सायकल रॅली व मुंबई येथील मोर्चासाठी जनजागृतीची चर्चा होती. ९ वाजल्यापासून ग्रामीण भागातील मराठा समाज दुचाकी मोटार सायकल घेऊन शिवाजी चौकात एकत्र येत होते. शिवाजी चौक, वसंतराव नाईक चौक, डॉ. आंबेडकर चौक ते चाटे चौक मार्गे राम मंदिर येथे पोहचली. दुचाकी रॅली पाहण्यासाठी दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. रॅलीमध्ये विद्यार्थी, महिला, अबालवृद्धांची मोठी उपस्थिती होती.माजलगाव मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीपर दुचाकी रॅलीत सहभागी समाजबांधवांनी डोक्याला भगव्या टोप्या, गळ्यात रूमाल आणि दुचाकीला झेंडे लावल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. मागील पंधरा दिवसापासुन रॅलीसाठी जनजागृती केली जात होती. रविवारी माजलगाव शहरात हजारो तरूणांनी यामध्ये सहभाग नोंदविला. शहरातील मंगलनाथ मैदानातुन रॅली निघून संभाजी चौक, आंबेडकर चौक, हनुमान चौक मार्गे छत्रपती शाळा ते शिवाजी चौकात रॅलीचा समारोप झाला. मोर्चाच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील मराठा समाजाचा तरूण एकवटला आहे.आष्टीत सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. रॅलीत शिस्त आणि उत्साह पहावयास मिळाला. रॅलीत युवकांची संख्या लक्षणीय होती. ही रॅली सकाळी ११ वाजता आष्टी शहरातील छत्रपती संकुलापासून सुरू झाली. गणपती मंदिर चौक, विनायकनगर, सावतानगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, अनिलभैय्या नगर, प्राध्यापक कॉलनी, किनारा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्यापारी पेठ, कमानवेस, डॉ. आंबेडकर चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे समारोप झाला. दुचाकीचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली.पाटोदा येथे मागील आठ दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चासंदर्भात जनजागृतीपर दुचाकी रॅलीसंदर्भात नियोजन सुरु होते. ठिकठिकाणी बैठका घेतला जात होत्या. यामध्ये रॅलीत घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन झाले. ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चात संदर्भातही सूचना देण्यात आल्या. रविवारी चुंबळी फाटा येथे सर्व बांधव एकत्र आले. शहरातील विविध मार्गांवरुन दुचाकी रॅली निघाली. त्यानंतर रॅली नगरपंचायत प्रांगणात आली. तेथे समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने समाजबांधव दुचाकीसह रॅलीत सहभागी झाला होता.