शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी देयक ांसाठी ८४ लाखांची तरतूद

By admin | Updated: July 27, 2016 00:51 IST

औरंगाबाद : जि.प. शिक्षकांची थकीत पुरवणी देयके निकाली काढण्यासाठी वित्त विभागाने तब्बल ८४ लाख रुपयांचे वित्तप्रेषण पंचायत समित्यांना वितरित केले आहे.

औरंगाबाद : जि.प. शिक्षकांची थकीत पुरवणी देयके निकाली काढण्यासाठी वित्त विभागाने तब्बल ८४ लाख रुपयांचे वित्तप्रेषण पंचायत समित्यांना वितरित केले आहे. वित्त विभागाच्या या तत्परतेमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. शिक्षकांच्या रखडलेल्या विविध पुरवणी देयकामध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी प्राप्त शिक्षकांच्या फरकांची रक्कम, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, अतिरिक्त शिक्षकांचे मासिक वेतन यांचा समावेश आहे. पुरवणी देयकाची ही रक्कम जवळपास ३ कोटी २१ लाख रुपये एवढी आहे. काल ८४ लाख एवढी रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आली. उर्वरित रक्कम दहा दिवसांत वितरित केली जाईल, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. अलीकडच्या काही महिन्यांपासून शिक्षकांची कोट्यवधी रुपयांची पुरवणी देयके रखडली आहेत. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावाही केला; पण पंचायत समितीस्तरावरून मागणी आल्याशिवाय त्यासंबंधीचे वित्तप्रेषण तयार करता येत नाही. अलीकडे काही पंचायत समित्यांनी पुरवणी देयकांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार ८४ लाख रुपयांचे वित्तप्रेषण सर्व पंचायत समित्यांना पाठविण्यात आल्याची माहिती जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे.के. चव्हाण, हारूण शेख, प्रवीण पांडे, दिलीप साखळे आदींनी १३ जुलै रोजी जि.प. प्रशासनाकडे यासंदर्भात तगादा लावला होता. त्यानुसार काल अखेर पुरवणी देयके निकाली काढण्यासाठी वित्त विभागाने पावले उचलली. त्यामुळे जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.