शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या विचारांच्या प्रसारासाठी अध्यासन केंद्रांना कोट्यवधींची तरतूद, खर्च फक्त सव्वा लाख

By राम शिनगारे | Updated: February 29, 2024 12:50 IST

विद्यापीठातील अध्यासनांची स्थिती; कारभाराच्या चौकशीसाठी कुलगुरू नेमणार समिती

छत्रपती संभाजीनगर : महापुरुषांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ अध्यासन केंद्रांची स्थापना केलेली आहे. या अध्यासन केंद्रांना प्रतिवर्षी प्रत्येकी ६ लाख ३ हजार रुपये निधी दिला जातो. सर्व अध्यासनांसाठी १ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद आहे. मात्र, मागील वर्षी या अध्यासन केंद्रांच्या संचालकांनी केवळ १ लाख २७ हजार रुपयेच खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याविषयी अधिसभा सदस्य डॉ. मुंजा धोंडगे यांनी अधिसभेच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता.

विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत सदस्य डॉ. धोंडगे यांनी अध्यासन केंद्रामध्ये प्रत्येकवर्षी ३ लाख रुपयांची तरतूद विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केली जाते. त्यात आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली, असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रशासनाने मागील काही वर्षांत एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. यावर झालेल्या चर्चेत डॉ. धोंडगे यांनी शिष्यवृत्तीसाठीचे पैसे खर्च होत नसतानाच विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यासाठीही निधी दिला जातो. अध्यासनांचे संचालक केवळ पदे घेऊन मिरवतात. ज्या हेतूसाठी अध्यासनांची स्थापना केली, ती साध्य होत नसल्याचेही सांगितले. त्याचवेळी या चर्चेत प्रा. हरिदास सोमवंशी, डॉ. संजय कांबळे, प्रा. सुनील मगरे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी सहभाग घेत निष्क्रीय संचालकांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. तसेच डॉ. धोंडगे यांनी आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्र अंबाजोगाई येथे हलविण्याची मागणी केली. त्याठिकाणी विद्यापीठाला मिळालेल्या २५ एकर जागेत अध्यासन केंद्राची इमारत बांधावी, असेही त्यांनी सुचवले.

व्यवस्थापन, अधिसभा सदस्यांची समितीअध्यासन केंद्राची रूपरेषा आणि संचालकांच्या निष्क्रियतेसंदर्भात व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांची एक समिती स्थापन केली जाईल. ही समितीच अध्यासनासंदर्भात पुढील निर्णय घेईल, असे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी सांगितले.

‘जीएमएनआरडीआरआय’चा खर्च फंडातून नकोविद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेसाठी (जीएमएनआरडीआरआय) आगामी अर्थसंकल्पात २२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यावर सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी आक्षेप घेतला. या संस्थेचे दायित्व राज्य शासनाने स्वीकारलेले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या फंडातून या संस्थेसाठी खर्च करू नका, अशी मागणीच त्यांनी बैठकीत केली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र