शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीसाठी २०० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:57 IST

टशेतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी राज्य शासनाने गटशेती योजना तयार केली असून, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : गटशेतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी राज्य शासनाने गटशेती योजना तयार केली असून, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे १४६ व्या द्वादश कार्यक्रमानिमित्त गटशेती करणा-या शेतक-यांचा मेळावा आणि गटशेती पाहणी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, सीईओ दीपक चौधरी, फळबाग शास्त्रज्ज्ञ डॉ.भगवान कापसे, जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तालुका अध्यक्ष गोविंदराव पंडित, सभापती साहेबराव कानडजे, चेरमन विजयनाना परिहार, जि.प. शालिकराम म्हस्के, संतोष लोखंडे, आशा पांडे, तुकाराम जाधव, शिवाजीराव थोटे, सुरेश दिवटे, मुकेश चिने, नाना भागिले, सुधीर पाटील, प्रदीप मुळे, दत्तू पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की गटशेती ही काळाची गरज आहे. जालना जिल्ह्यातील गटशेतीचे मॉडेल राज्य शासनाने स्वीकारले असून, गटशेती करणा-या शेतक-यांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कृषी योजनांचा लाभ दिला जाईल. १८ आॅक्टोबरपासून कापूस उत्पादक शेतक-यांसाठी शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदी करून घेतला जाईल. त्यामुळे शेतक-यांनी व्यापाºयांना कापूस न देता शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर द्यावा.गटशेती प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी माहिती दिली. या वेळी खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ.संतोष दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गटशेती करणारे चांगुणाबाई बाळू कापसे यांच्या शेतातील शेत तळे, द्राक्ष बागेची पाहणी केली. जीवरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यामध्ये अडविण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. तसेच राजूर ते टेंभूर्णी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाले. उद्धव दूनगहू यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंदराव पंडित यांनी आभार मानले.