शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मनपाच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्त प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:05 IST

अतिक्रमण हटाव पथकासाठी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडून कायमस्वरूपी बंदोबस्त घेतला होता शनिवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अतिक्रमण हटाव पथकासाठी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडून कायमस्वरूपी बंदोबस्त घेतला होता. या पोलीस कर्मचाºयांच्या पगाराची रक्कम दर महिन्याला पोलीस आयुक्तालयात जमा करावी लागते. मागील काही वर्षांपासून मनपाने पैसेच भरले नाहीत. त्यामुळे मागील महिन्यात आयुक्तालयाने पोलीस बंदोबस्त काढून घेतला होता. शनिवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पूर्वी मनपाला सतत पोलीस बंदोबस्त मागवून घ्यावा लागत होता. पोलीस आयुक्तालयाने मनपाला १ पोलीस निरीक्षक आणि २० कर्मचारी कायमस्वरूपी दिले. बंदोबस्तासाठी देण्यात आलेले कर्मचारी तीन ते चार वर्षांपासून महापालिकेत काम करीत होते.मनपा प्रशासनाने पोलीस आयुक्तालयात साडेसहा कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने सर्व पोलीस कर्मचारी मागील महिन्यात मनपातून काढून घेतले होते.अतिक्रमण हटावसाठी घेण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तापोटी दरवर्षी महापालिकेला १ कोटी ८ लाख रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून महापालिकेने ही रक्कम पोलीस आयुक्तालयाकडे जमाच केली नाही. आयुक्तालयाने पैसे भरावेत, अशी मागणी मनपाकडे वारंवार केली. ६ कोटी ५० लाख रुपये भरण्यास महापालिकेकडून विलंब झाला. शेवटी मागील महिन्यात पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला होता. शनिवारी परत मनपाला पोलीस बंदोबस्त प्रदान करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.