शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ महामार्ग होण्याआधीच नामकरणाची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:06 IST

: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देभाजप-शिवसेना वादात राष्ट्रवादी काँगे्रसची उडी : राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी

औरंगाबाद : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. यातच भाजपच्या आमदारांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी केली. रस्ता कामाला सुरुवात होण्याअगोदरच नावावरून वादविवाद सुरू झाले आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना दिलेल्या निवेदनात अभिजित देशमुख यांनी म्हटले आहे की, विदर्भातील सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव यांच्या कन्या राजमाता जिजाऊ नंतर मराठवाड्यातील वेरूळला शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून नांदायला आल्या. या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळख प्राप्त झाल्यास या महामार्गालाही एक भूषण प्राप्त होईल. खरं तर राजमाता जिजाऊ यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राला समृद्धी लाभत नाही. मग समृद्धी महामार्ग त्यांच्या नावाशिवाय कसा होईल. हा महामार्ग विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र-कोकण, मुंबई प्रांत यांना जोडणारा आहे. या सर्व विभागांना जोडणारा ऐतिहासिक दुवा हा जिजाऊ हाच आहे. यामुळे समृद्धी महामार्गाला राजामाता जिजाऊ यांचे नाव देणे अधिक संयुक्तिक ठरेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.महिलांचा सन्मान होईलजिजाऊ यांचे नाव दिल्यास ज्या गौरवशाली इतिहासाचा महाराष्ट्राला आणि देशाला सार्थ अभिमान वाटतो, त्या परंपरेचे स्मरण यानिमित्ताने सदैव होत राहील. महाराष्ट्राचे मन, मनगट आणि मणका समृद्ध करणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव या महामार्गाला दिल्यास महिलांविषयी असलेल्या सन्मानाचे एक उदाहरण जगासमोर जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.------------

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकPoliticsराजकारण