शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रकुलगुरूंची नेमणूक होईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे. या पदावर नेमणुकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी शिफारस केली. मात्र, राज्यपाल कार्यालय कोणालाही जुमानत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी बीसीयूडीऐवजी प्रकुलगुरूंना अधिकार देण्यात आले आहेत. बीसीयूडी हे पदच नवीन कायद्याने रद्द केले. यामुळे राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांना प्रकुलगुरू नेमणे बंधनकारक झाले होते.राज्यातील काही विद्यापीठांमध्ये पूर्वीपासूनच प्रकुलगुरू कार्यरत होते. मात्र, ज्या विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरू नव्हते, अशा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रकुलगुरूंची नेमणूक करण्यासाठी राज्यपालांकडे तीन नावांची शिफारस केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनीही तीन जणांची शिफारस केली.या शिफारशीनुसार राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन, विभागप्रमुख डॉ. एस.जी. हिवरे आणि भूगर्भतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर दुसºयाच दिवशी प्रकुलगुरू निवडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यात भाजपशी संबंधित असलेल्या ‘अभाविप’चे कार्यकर्ते असलेले डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या नेमणुकीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याचे समजते. यानंतर डॉ. तेजनकर यांच्या नावालाही सत्ताधारी गोटातून पसंती देण्यात आली. मात्र, अद्यापही त्याविषयी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.प्रकुलगुरूंच्या नेमणुकीसाठी विधानसभ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘एका’ उमेदवाराच्या नावाची शिफारस केली. या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही होकार कळविला असल्याचे समजते. तरीही प्रकुलगुरूंची नेमणूक होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमणूक रखडलेले एकमेव विद्यापीठराज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरूंची तात्काळ नेमणूक केली आहे. मात्र, केवळ औरंगाबादचेच विद्यापीठ या नेमणुकीपासून वंचित ठेवलेले आहे. मराठवाड्यातील लोकांना अन्याय सहन करण्याची सवय असल्यामुळे या दिरंगाईबद्दल कोणी ‘ब्र’शब्दसुद्धा काढलेला नाही. हे विशेष. ‘संघ’ विचाराचा एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे ही निवड रखडल्याचेही बोलले जाते. मात्र, यात विद्यापीठाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात आहे.