हिंगोली : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव गैरहजर राहिल्याने आखाडा बाळापूर येथील वादग्रस्त विषयावर चर्चा झाली नाही. दरम्यान, या विषयावर आता ९ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.जि. प. सभागृहात गुरूवारी दुपारी अध्यक्षा मिनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. या प्रसंगी सीईओ पी.व्ही. बनसोडे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, शिक्षण सभापती रंगराव कदम, कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, समाजकल्याण सभापती मधुकर कुरूडे, महिला व बालकल्याण सभापती निलावंती सवंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत २०१४-१५ ची दरसुची मंजूर करण्यात आली. तसेच सवना येथील सरपंचावरील कारवाई, सेनगाव पं. स. मधील कनिष्ठ लेखाधिकारीपद एक वर्षापासून रिक्त असल्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली. चर्चेत जि. प. सदस्य गजानन देशमुख, मुनीर पटेल, विनायक देशमुख, आश्विनी यंबल आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
जि.प.च्या विशेष सभेचा प्रस्ताव
By admin | Updated: September 5, 2014 00:09 IST