शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

विद्यावेतनाचा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

औरंगाबाद : पीएलए निधीतून २४० निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन करण्याचा घाटी प्रशासनाचा प्रस्ताव जिल्हा कोषागार कार्यालयाने धुडकावून लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

औरंगाबाद : पीएलए निधीतून २४० निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन करण्याचा घाटी प्रशासनाचा प्रस्ताव जिल्हा कोषागार कार्यालयाने धुडकावून लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आॅक्टोबर महिन्याचे विद्यावेतन पीएलए फंडातून करण्यात आले होते. कोषागार कार्यालयाच्या दणक्यामुळे घाटीतील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन दोन महिन्यांपासून रखडले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सुमारे २४० निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या निवासी डॉक्टरांना शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाते. शासनाच्या नॉन प्लॅन योजनेंतर्गत असलेल्या विशेष निधीतून वेतनावर खर्च केला जातो. दरमहा विशिष्ट रक्कम शासकीय महाविद्यालयाच्या खात्यावर जमा केली जाते. घाटीसाठी सुमारे १४ लाख रुपयांची गरज आहे. मात्र, यावर्षीच्या सुरुवातीपासूनच विद्यावेतनासाठी ६ ते ९ लाख रुपये घाटीच्या खात्यात जमा केले जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. सूत्राने सांगितले की, आॅक्टोबरपासून विद्यावेतनाचा निधी शासनाकडून आलाच नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांकडून वारंवार विद्यावेतनासाठी मागणी होत असल्याने घाटी प्रशासनाने पीएलए निधीतून विद्यावेतन अदा करण्यासंदर्भात वैद्यकीय संचालकांकडून परवानगी मिळविली. त्यानंतर कोषागारात पगारपत्रक सादर करून पीएलए फंडातून आॅक्टोबर महिन्याचे विद्यावेतन नोव्हेंबर महिन्यात अदा करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत शासनाकडून विद्यावेतनाचा निधी घाटीला देण्यात आला नाही. त्यामुळे प्रशासनास नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे विद्यावेतन निवासी डॉक्टरांना अदा करता आले नाही. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांची विशेष परवानगी घेऊन घाटी प्रशासनाने पुन्हा निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पीएलए फंडातून अदा करण्यासाठी पगार बिल तयार करून ते कोषागार कार्यालयास सादर केले. जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत संचालकांच्या परवानगीने पीएलए फंडातून विद्यावेतन देता येते, असा शासन निर्णय असल्यास तो सादर करा, तरच पीएलए फंडातून वेतन अदा क रण्यास परवानगी देतो, असे बजावले. मात्र, अद्यापपर्यंत शासनाने असा कोणताही आदेश काढलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या विद्यावेतनाचा प्रस्ताव कोषागार कार्यालयाने धुडकावला. परिणामी दोन महिन्यांपासून विद्यावेतनाचा प्रलंबित प्रश्न आजही कायम आहे.