शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

५०० गावांत शुद्ध पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव

By admin | Updated: August 8, 2014 01:26 IST

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़ हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून सदर आराखड्यास राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे़जिल्ह्यातील अनेक गावांत दुषीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्याचवेळी किनवट व माहूर तालुक्यासह अन्य भागातही काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ येथील नागरिक विविध आजारांशी लढा देत आहेत़ ही बाब लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी गावांमध्ये पाणीपुरवठा यंत्र बसविण्याबाबत चाचपणी केली़ त्यानुसार केंद्र शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधीतून हा आरोग्यदायी प्रकल्प राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांनी शुध्द पाणीपुरवठा यंत्राबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत़ या सर्व गावातील यंत्रांसाठी जवळपास १६ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे़ प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा यंत्र बसविले जाणार आहेत़ एका यंत्रासाठी ३ लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षीत आहे़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या यंत्रांसाठी अपेक्षीत किंमतीच्या निविदा मागविल्या आहेत़ राज्यभरातील विविध कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्याची छाननी केली जात आहे़ मागास क्षेत्र अनुदान निधी प्राप्त होताच प्रस्ताव आलेल्या गावात पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात येथील अशी माहिती प्रभारी प्रकल्प संचालक गुलाबसिंह राठोड यांनी दिली़ (प्रतिनिधी)