शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विनानिविदा आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:59 IST

महापालिकेत मागील काही महिन्यांपासून आऊटसोर्सिंगची जोरदार धूम सुरू आहे. कोणतेही काम आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यावर अधिक ‘भर’ देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत मागील काही महिन्यांपासून आऊटसोर्सिंगची जोरदार धूम सुरू आहे. कोणतेही काम आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यावर अधिक ‘भर’ देण्यात येत आहे. शहरात रात्रीही साफसफाई करावी, अशी मागणी जोर धरताच प्रशासनाने विनानिविदा एका खाजगी एजन्सीमार्फत ५० मजूर नियुक्त करण्यास मान्यता दिली. नेहमी नियमांवर बोट ठेवणाºया प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून २२ डिसेंबर रोजी होणाºया स्थायी समितीसमोर प्रस्तावही सादर केला आहे.महापालिकेत बचत गटामार्फत साफसफाई करण्यात येते. एका खाजगी एजन्सीकडून सुरक्षारक्षक, वसुलीसाठी कर्मचारी, पाणीपुरवठ्यासाठी लाईनमन घेण्यात आले आहेत. याशिवाय संगणक आॅपरेटर म्हणून आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचे आऊटसोर्सिंग केले आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये आऊटसोर्सिंगवर खर्च होत आहेत. मागील महिन्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाजारपेठेतही रात्री साफसफाई करण्यात यावी, अशी सूचना प्रशासनाला केली. मनपा कर्मचाºयांमार्फत किंवा बचत गटामार्फत काम करावे, असा त्यांचा संदर्भ होता. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी २२ डिसेंबर रोजी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात नमूद केले आहे की, केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात रात्री सफाई केल्यास मनपाला अधिक गुण मिळणार आहेत. मनपात एक संस्था ज्या दरात मजूर पुरविण्याचे काम करीत आहे, त्याच दरात सर्वज्ञ एजन्सी ५० कर्मचारी मनपाला पुरविणार आहे. यातून रात्री बाजारपेठेत साफसफाई करण्यात येईल.एका मजुराला दरमहा १३ हजार ९५० रुपये मनपाला द्यावे लागतील, असे प्रस्तावात नमूद केले आहे.सर्वज्ञ एजन्सीला दोन महिन्यांपूर्वीच परवाना मिळालेला आहे. या एजन्सीकडे कोणताही अनुभव नाही.निविदा प्रक्रिया पार न पाडता थेट काम कसे काय देण्यात येत आहे. हा प्रस्ताव त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेता फेरोज खान यांनी आयुक्तांकडे केली आहे.निविदा का नाहीमहापालिकेला कोणतेही काम खाजगी एजन्सीकडून करून घ्यायचे असल्यास निविदा पद्धतीचा अवलंब करावा लागतो. एक खाजगी एजन्सी मनुष्यबळ पुरविण्याचे काम घेत असताना मनपाने निविदा पद्धतीचा अवलंब का केला नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती होती की, निविदा न मागविता एका एजन्सीला लाखो रुपयांचे काम देण्यात येत आहे.