शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
2
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
3
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देताहेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
4
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
5
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
6
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
7
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
8
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
9
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
10
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
11
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
12
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
13
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
14
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
15
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
16
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
17
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
18
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
19
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
20
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी

देवगिरीच्या यात्रेकरू करासाठी दिल्लीला प्रस्ताव

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : देवगिरी किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर दौलताबाद ग्रामपंचायतीने लावलेला यात्रेकरू कर दोन महिन्यांच्या आतच पुरातत्व विभागाने बंद पाडून पर्यटकांना

औरंगाबाद : देवगिरी किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर दौलताबाद ग्रामपंचायतीने लावलेला यात्रेकरू कर दोन महिन्यांच्या आतच पुरातत्व विभागाने बंद पाडून पर्यटकांना सुविधा पुरविण्यासह ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीच्या जिल्हा परिषदेच्या प्रयत्नाला कोलदांडा घातला आहे. यात्रेकरू कर वसुलीस मंजुरी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार केला असून तो आता दिल्लीच्या पुरातत्व विभागाला पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी २०१४ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने दौलताबाद ग्रामपंचायतीला यात्रेकरू कर वसूल करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार दि.१ एप्रिलपासून कर वसुली सुरू झाली होती. या करातून पर्यटकांना शौचालयासह पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. सध्या या सुविधा किल्ला परिसरात नसल्यामुळे पर्यटकांची कुचंबणा होते. देवगिरी किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रत्येकी २ रुपये यात्रेकरू कराची वसुली दौलताबाद ग्रामपंचायतीने दि.१ एप्रिल २०१४ पासून सुरू केली होती. त्यासाठी ग्रामपंचायतीने किल्ल्यासमोर एक काऊंटर सुरू केले होते. हे काऊंटर सुरू होताच पुरातत्व खात्याने त्यावर आक्षेप घेतला. पुरातत्व विभागाने यासंदर्भात उच्च पातळीवरून पत्रव्यवहार सुरू केला. शेवटी ग्रामपंचायतीने कर वसुली थांबवावी, असे आदेश दि.२१ मे रोजी जिल्हा परिषदेला द्यावे लागले.देवगिरी किल्ला पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे. या वास्तूपासून १०० मीटरच्या आत कुणालाही काहीही करता येत नाही, असे पुरातत्व खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही यात्रेकरू कर वसुली बंद करण्याचा निर्णय घेतला. -दीपक चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदवाहतूक कोंडी होईलग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले तरच विकासाचा मार्ग सुकर होईल. त्यासाठीच कायदेशीरपणे कराची अंमलबजावणी सुरू केली होती. किल्ल्यापासून दूर १०० मीटर अंतरावर करासाठी वाहने रोखणे व्यवहार्य नाही. त्यातून वाहतूक कोंडी होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून वसुली बंद करणे हाच एक मार्ग होता. -वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारीएप्रिल व मे महिना परीक्षांचा असतो. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होती, तरीही दोन महिन्यांत जवळपास ७५ हजारांची कर वसुली झाली. परंतु पुरातत्व विभागाच्या आक्षेपामुळे ही वसुली बंद करावी लागली. पुरातत्व विभागाच्या दिल्ली मुख्यालयातून परवानगीची आवश्यकता आहे. त्यासाठीचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव दिल्लीला पाठविला जाईल.-जी.एस. पाटील, ग्रामविकास अधिकारी, दौलताबाद