शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जात पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा समित्यांकडे वर्ग

By admin | Updated: January 13, 2017 00:36 IST

लातूर : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आलेले सर्व प्रस्ताव विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जिल्हा समित्यांकडे वर्ग केले आहेत.

लातूर : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आलेले सर्व प्रस्ताव विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जिल्हा समित्यांकडे वर्ग केले आहेत. लातूर विभागीय जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश होता. चार जिल्ह्यांच्या स्वतंत्र समित्या झाल्या असून, त्यांच्याकडे विभागीय समितीने ७ हजार ६९१ प्रस्ताव वर्ग केले आहेत़ २१ नाव्हेंबरपासून जिल्ह्यांसाठी स्वतंत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लातूर विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी लातूरच्या विभागीय कार्यालयाकडे दाखल करावे लागत होते. मात्र, आता स्वतंत्र जात प्रमाणपत्र पडताळणी सामित्यांची स्थापना केल्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने या समित्या सोयीच्या होणार आहेत.नांदेड जिल्हा समितीकडे ४ हजार १०२ प्रस्ताव वर्ग केले आहेत. यात विद्यार्थी १६२४, सेवा प्रकरण २०२, निवडणूक १८०, इतर १, दक्षता पथकाकडील विद्यार्थी संचिका ११६, दक्षता पथकाकडील सेवा संचिका ३६६, दक्षता पथकातील निवडणूक संचिका १०३, सुनावणीतील विद्यार्थी संचिका ४५७, सुनावणीतील सेवा संचिका २३५, सुनावतील निवडणूक संचिका १६३, हायकोर्ट रिमांडेड संचिका १०, तक्रार संचिका २३, अपिल संचिका १८, वैधता प्रमाणपत्र ५५९ आणि नोंदणी रजिस्टर ४५ असे एकूण ४ हजार १०२ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. हिंगोली जिल्हा समितीकडे १ हजार २६९ प्रस्ताव वर्ग केले आहेत. यात विद्यार्थी ३७१, सेवा प्रकरण ४२, निवडणूक १७६, दक्षता पथकाकडील विद्यार्थी संचिका ४१, दक्षता पथकाकडील सेवा संचिका ४२, दक्षता पथकाकडील निवडणूक संचिका ५२, सुनावणीतील विद्यार्थी संचिका ११७, सुनावणीतील सेवा संचिका ४५, सुनावणीतील निवडणूक संचिका ९५ आणि इतर २८८ आदीं प्रस्तावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)