शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जलपरीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा प्रस्ताव

By admin | Updated: July 28, 2016 00:59 IST

लातूर : लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही.

लातूर : लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत जलपरीची सेवा कायम ठेवावी, असा प्रस्ताव महानगर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे.लातूर शहरात अभुतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने १२ एप्रिलपासून लातूर शहराला रेल्वेव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या अर्धा पावसाळा संपला तरी मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. शिवाय, जिल्ह्यातील प्रकल्पही कोरडेठाक आहेत. सध्याही पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची सेवा बंद करण्यात येऊ नये. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही आणि प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जलपरीची सेवा सुरू ठेवावी, असे लातूर महानगर पालिकेने सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. परंतू या पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर अद्याप आले नाही. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा साठा झालेला नाही. मांजरा प्रकल्प क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, मांजरा प्रकल्प कोरडा आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याशिवाय, लातूरकरांना नळाव्दारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे जलपरीची सेवा आवश्यक असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आले आहे. चांगला पाऊस होईपर्यंत जलपरी़़़४लातूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत ३३७ मि़मी़ पाऊस झाला आहे़ मात्र या पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर आले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठा झालेला नाही़ शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रातही मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे या प्रकल्पातही पाण्याची पातळी वाढली नाही़ गेल्या दोन दिवसांत लातूर शहर व जिल्ह्यात तसेच मांजरा प्रकल्प क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे़ परिणामी, हळूहळू पाणी यायला सुरूवात झाली आहे़ परंतु, नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी स्थिती नाही़ त्यामुळे जलपरीच्या मदतीची गरज असल्याचे रेल्वे प्रशासनाला कळविण्यात आले आहे़ रेल्वेकडे मुदत वाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मुदतवाढ मिळेल. जोपर्यंत पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत रेल्वेची सेवा राहणार आहे. तसे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे बोलणे झाले असून, प्रस्तावाला मुदवाढ देण्यासाठी रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्याचे लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कावळे यांनी सांगितले.