शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१८० गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव

By admin | Updated: May 16, 2017 23:20 IST

बीड : वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या १८० जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या १८० जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची दस्तूरखुद्द अधीक्षक जी. श्रीधर हे स्वत: हजेरी घेणार आहेत.खून, मारामाऱ्या, घरफोड्यांसह अवैध व्यवसायांमध्ये तेच ते आरोपी सहभागी असल्याचे अधीक्षक श्रीधर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सर्व ठाणेप्रमुखांना आपल्या हद्दीतील गुन्हे प्रवृत्तीच्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात एप्रिलअखेरपर्यंत १८० गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव ठाणेप्रमुखांनी संबंधित उपअधीक्षकांकडे पाठविले होते. उपअधीक्षकांनी सुनावणी घेऊन तडीपारीच्या कारवाईची शिफारस अधीक्षकांकडे केली. अधीक्षकांच्या स्वाक्षरीसह हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेले आहेत. या प्रस्तावांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी चर्चा करुन उपविभागीय अधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत.दरम्यान, तडीपारीच्या १८० प्रस्तावांसोबत काही जणांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी गेवराई तालुक्यातील दोन वाळू माफियांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. उपअधीक्षकांकडे आणखी १५ प्रकरणे प्रलंबित असून त्यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे तडीपारीच्या कारवाईच्या प्रस्तावांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अधीक्षक जी. श्रीधर यांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार करणाऱ्या आरोपींचा स्वत: आढावा घेणार आहेत. ‘हिस्ट्रीसीटर’ गुन्हेगारांची यादी पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. यापैकी काही गुन्हेगार जामिनावर सुटलेले आहेत. त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.