औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीची शहरात सुरू असलेली चर्चा आता विधानसभेच्या तोंडावर जवळपास बंद झाली असून, पार्टीचे कार्यक्रमही चांगलेच थंडावले आहेत. दिल्लीत सरकारात आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची शहरात मोठी चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीत तर आम आदमी पार्टीचा मोठा गाजावाजा झाला होता. पार्टीने शहरात केलेल्या सदस्य नोंदणीत २३ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवाराला सदस्य नोंदणी एवढेही मतदान झाले नाही. देशपातळीवरही पक्षाची कामगिरी नोंद घ्यावी एवढी लक्षणीय ठरली नाही. त्यामुळे आपचे आलेले वादळ अल्पावधीतच शमल्याचे दिसते आहे. विस्तार व बांधणीचे काम सुरूहरमितसिंग यांनी सांगितले की, सध्या पक्ष विस्तार व बांधणीवर लक्ष देतो आहे. त्यामुळे इतर कार्यक्रम दिले जात नाहीत. प्रत्येक सरकारी कार्यालयाबाहेर सकृतदर्शनी ‘नागरिकांच्या हक्काची सनद’ लावणे बंधनकारक आहे; परंतु सर्वच कार्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ही सनद कार्यालयासमोर लावण्याचा उपक्रम पक्षातर्फे राबविला जात आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाने यापूर्वी केलेल्या सदस्य नोंदणीतील सक्रिय सदस्यांचा शोध घेतला जात आहे. त्यातून जिल्हा कार्यकारिणीची निवड होईल. जिल्हा कार्यकारिणीनंतर विभागीय कार्यकारिणी व नंतर राज्य कार्यकारिणी गठीत केली जाणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलकडे दोन्ही बाजूची मते नोंदविण्यात आली आहेत. त्यावर आठवडाभरात निर्णय होईल, असे आपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष लोमटे यांनी सांगितले. लोमटे म्हणाले, आम्ही पक्षपातळीवर कार्यक्रम घेत आहोत. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. येत्या रविवारी (दि.३) पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात सुरेश खोपडे मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक लढविण्यावर लवकरच निर्णयमहाराष्ट्रासह देशात होणाऱ्या चार राज्यांतील निवडणुक ीपैकी फक्त हरियाणात विधानसभा लढण्याचे मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. त्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्रातील चांगल्या २०-३० जागा किमान लढवाव्यात, यासाठी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली जाणार आहे.
कार्यक्रम बंद, ‘आम आदमी’ चर्चेतूनही बाद
By admin | Updated: July 29, 2014 01:14 IST